जिल्हा

ठामपाकडून सफाई कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्कार

ठामपाकडून सफाई कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्कार
ठामपाकडून सफाई कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्कार फोटो: ठाणे वैभव
ठाणे: भारतीय प्रजासत्ताकाचा ७६वा वर्धापन दिन ठाणे महापलिकेच्या वतीने रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकावून ध्वजाला आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी मानवंदना दिली. राष्ट्रगीत तसेच राज्यगीत झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, सुरक्षा दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. ध्वजवंदनानंतर, ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन आयुक्त सौरभ राव यांनी सन्मान केला. लक्ष्मी वालकरी, हरिश्चंद्र डोंगरे, अनंत जाधव, दिनेश महाडिक, अशोक पाबरे, बानू घुमाडिया, संतोष शिंदे, उषा पाटील, भाग्यश्री गायकवाड, लता गायकवाड या विविध प्रभाग समिती क्षेत्रातील सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. ध्वजवंदन सोहळ्यास, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे सर्व उपायुक्त, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी आदी मोठ्या उपस्थित होते. प्रांगणातील सोहळ्यानंतर, महापालिका भवन येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याबरोबरच, महापालिका क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या पुतळयांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास आणि कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475