जिल्हा

रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक
रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक फोटो: ठाणे वैभव
ठाणे : मध्य रेल्वेचा मुंबई विभाग 17 नोव्हेंबर 24 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक करणार आहे. सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन स्लो मार्गावर ब्लॉक होणार आहे. सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ पर्यंत ठाण्याहून सुटणा-या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन येथे थांबवल्या जातील आणि पुढे अप धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. छशिमटहून सकाळी 10.14 ते दुपारी 3.52 पर्यंत सुटणा-या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांच्या दरम्यान सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि पुढे मुलुंड येथे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. स्टेशन आणि गंतव्यस्थानावर नियोजित वेळेच्या 15 मिनिटांनी पोहोचेल.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475