जिल्हा

पक्षात घेण्यासाठी मुंडेच पवारांच्या मागे लागले होते

पक्षात घेण्यासाठी मुंडेच पवारांच्या मागे लागले होते
पक्षात घेण्यासाठी मुंडेच पवारांच्या मागे लागले होते फोटो: ठाणे वैभव
देवेंद्र फडणवीस यांना जितेंद्र आव्हाड यांचे प्रत्युत्तर ठाणे : राजकीय पक्ष फोडण्यात शरद पवार हे पितामह भीष्म आहेत या देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांनी टीका करण्यापूर्वी इतिहास तपासायला पाहिजे. आपल्याला पक्षात घेण्यासाठी धनंजय मुंडेच शरद पवार यांच्यामागे लागले होते. त्यावेळी स्वतः शरद पवार यांनी गोपीनाथ मुंडेंना फोन करून घर फुटू देऊ नका असे सांगितले होते. त्यामुळे घर फुटू नये अशीच भूमिका शरद पवारांची होती, असे आव्हाड यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस यांच्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनीही त्याच पद्धतीने उत्तर दिले आहे. आव्हाड म्हणाले, धनंजय मुंडे अनेक दिवस शरद पवार यांना भेटत होते. आपल्याला पक्षात घ्या म्हणून ते पवार यांच्या मागे लागले होते. मात्र सहा महिने शरद पवार यांनी त्यांना पक्षात घेण्यास टाळाटाळ केली. अखेर पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांना फोन करून सांगितले कि घर फुटू देऊ नका. धनंजय मुंडे यांचा पक्षप्रवेश हे शरद पवार यांच्या मनाच्या विरोधात होता, अशी माहिती यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिली. पवार केवळ तालुका स्तरावरील नेते आहेत, या टीकेलाही आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. टीका करणाऱ्यांना शेतकऱ्यांचा अभ्यास किती आहे मला माहित नाही. पवार हे तळागाळातील नेते आहेत हे मला मान्य आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत राजकारण करणारे शरद पवार यांना तोड नसल्याचे आव्हाड म्हणाले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475