जिल्हा

प्रभाग समित्यांच्या बैठका रखडल्या

प्रभाग समित्यांच्या बैठका रखडल्या
प्रभाग समित्यांच्या बैठका रखडल्या फोटो: ठाणे वैभव

४५ लघुलेखकांची पदे रिक्त

ठाणे : ठाणे महापालिकेच्या प्रभाग समित्यांचे विकेंद्रीकरण होऊन दोन महिने उलटले असतानाच या समित्यांच्या कामकाजासाठी आवश्यक लघुलेखकांची कमतरता जाणवत आहे. महापालिकेत मराठी लघुलेखकांची तब्बल ४५ पदे असून सध्या केवळ १८ लघुलेखक कार्यरत आहेत. त्यामुळे नव्याने विकेंद्रित झालेल्या प्रभाग समित्यांच्या बैठका घेणे आणि त्यांचे इतिवृत्त तयार करण्यास अडचणी निर्माण झाल्याचे समोर आले आहे.

महापालिकेतील लघुलेखकांवर आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, महापौर, उपमहापौर तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकींचे कामकाज सांभाळण्याची जबाबदारी आहे. बैठकीतील चर्चा, सूचना, निर्णय आणि प्रशासनाकडून देण्यात आलेले निर्देश तत्काळ लघुलेखनाच्या माध्यमातून नोंदवून त्याचे अधिकृत इतिवृत्त तयार केले जाते. त्यामुळे बैठक झाली तरी तिचे अधिकृत दस्तऐवजीकरण करण्यासाठी लघुलेखकाची भूमिका महत्त्वाची ठरते.

महापालिकेच्या कामकाजाचे विकेंद्रीकरण करताना प्रभाग समित्यांना अधिक अधिकार आणि जबाबदाऱ्या देण्यात आल्या. मात्र, त्याचवेळी या समित्यांच्या नियमित कामकाजासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध आहे का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. लघुलेखकांची पदे आधीपासूनच मोठ्या प्रमाणात रिक्त असताना  कामकाजाचा भारही वाढला आहे. परिणामी उपलब्ध १८ लघुलेखकांवरच विविध वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकींचा भार आहे.

मोबाईल रेकॉर्डिंग, व्हॉइस टायपिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून ध्वनिमुद्रणाचे लिखित स्वरूपात रूपांतर करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लघुलेखकाचे काम तंत्रज्ञानामुळे कालबाह्य होईल, असे चित्र निर्माण झाले असले तरी प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजात त्यांची गरज अद्याप कायम आहे. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे, निर्णय आणि सूचनांची तत्काळ नोंद घेऊन त्याचे अधिकृत इतिवृत्त तयार करण्यासाठी प्रशिक्षित लघुलेखकांची आवश्यकता भासत आहे.

दरम्यान, टंकलेखन आणि लघुलेखनाचा पारंपरिक अभ्यासक्रमही काळानुसार बदलला आहे. टाईपरायटरचा वापर जवळपास इतिहासजमा झाला असला तरी प्रशासकीय कामकाजात लघुलेखन कौशल्याची गरज अद्याप संपलेली नाही. त्यामुळे रिक्त पदे भरण्यासोबतच बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत पद्धतीने लघुलेखकांच्या कामकाजाचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475