जिल्हा

कल्याण न्यायालयात वकिलाला पोलिसाची मारहाण

कल्याण न्यायालयात वकिलाला पोलिसाची मारहाण
कल्याण न्यायालयात वकिलाला पोलिसाची मारहाण फोटो: ठाणे वैभव
कल्याण : पार्किंगच्या वादातून कल्याण न्यायालयात पोलिसाने वकिलाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सर्व वकिलांनी या मारहाणीचा तीव्र निषेध व्यक्त केला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करत कारवाई करण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीशांनी दिले आहेत. कल्याण न्यायालयात वकील प्रशिक अडांगळे हे मागच्या गेटने बाहेर जात होते. याठिकाणी चौधरी नामक पोलीस कर्मचारी होते. पार्किंगमध्ये असलेली गाडी काढताना पोलिसाने दारू पिऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप वकील प्रशिक अडांगळे यांनी केला असून याबाबत प्रिन्सिपल जज यांना तक्रार केली असून पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर कल्याण क्रिमिनल बार असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनीही निषेध नोंदवला. असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. विनोद गोविल यांनी सांगितले की, संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी करत सत्र न्यायाधीशांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, महात्मा फुले पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सिंग परदेशी यांनी सांगितले की, वाहनांना गेटमधून बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. त्यांच्या मते, वकील आणि पोलीस अधिकारी यांच्यातील वादाचे हेच कारण होते. दोन्ही पक्षांच्या तक्रारींच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. सूत्रांनुसार, जिल्हा न्यायाधीशांनीही ही घटना गंभीर घेत या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475