जिल्हा

कोपरी सॅटिस प्रकल्प अंतिम टप्प्यात

कोपरी सॅटिस प्रकल्प अंतिम टप्प्यात
कोपरी सॅटिस प्रकल्प अंतिम टप्प्यात फोटो: ठाणे वैभव
खासदार नरेश म्हस्के आणि मध्य रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक ठाणे: मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला पूर्व ठाण्यातील कोपरी सॅटिस प्रकल्प अंतिम टप्प्यात आला असून पूर्व ठाण्यातील वाहतूक कोंडीला सुटून ठाणेकर प्रवाशांना चांगली सेवा मिळण्याची शक्यता आहे. या पुलावरून लवकरच ठाणे महानगरपालिकेची टीएमटी बस सेवा सुरू होणार असल्याची माहिती ठाणे लोकसभेचे खा. नरेश म्हस्के यांनी दिली. येत्या दोन महिन्यात ही बस सेवा सुरू होईल, असे प्रयत्न करण्यात येणार आहे. बुधवारी खासदार म्हस्के आणि मध्य रेल्वेचे डीआरएम हिरेष मीना यांनी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील विविध विकासकामांची संयुक्त पाहणी केली. त्यानंतर रेल्वे प्रशासन, महापालिका आणि प्रवासी संघटनांसोबत बैठक घेण्यात आली. कोपरी सॅटिस पुलाचे मुख्य बांधकाम आणि गर्डरचे काम पूर्ण झाले असून सध्या फिनिशिंगची कामे सुरू आहेत. तसेच रेल्वे रुळांखालील मायक्रो टनेलिंगचे कामही पूर्ण झाले आहे. सॅटिसवरून टीएमटी बस सुरू करण्यासाठी महापालिका आणि रेल्वे प्रशासनात समन्वय सुरू असल्याचे सांगण्यात आले. बैठकीत ठाणे स्थानकावरील विविध प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. डी-मार्टच्या सी एस आर निधीतून उभारण्यात येणाऱ्या स्वच्छतागृहाच्या कामातील दिरंगाईवर खासदार म्हस्के यांनी नाराजी व्यक्त केली. प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६ वरील एस्कलेटरचे काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच १५ डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामावरही चर्चा झाली. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, मुलुंड दिशेला नवीन पादचारी पुलालाही मंजुरी मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले. बी केबिन परिसरातील रहिवाशांच्या विस्थापनाचा मुद्दा लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोगली धरण' हस्तांतरणाचा विषय ऐरणीवर ​नवी मुंबई आणि परिसरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, दिघा विभागातील इलठणपाडा येथील रेल्वेच्या मालकीचे 'मोगली धरण' नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा विषय या बैठकीत उपस्थित करण्यात आला. रेल्वे या धरणाचा वापर करत नाही. जर ते पालिकेच्या ताब्यात दिले, तर परिसराचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. नवी मुंबईतील माजी नगरसेविका चांदणी चौगुले, अॅड. श्वेता काळे आणि गौरी आंग्रे यांनी दिलेल्या निवेदनानुसार हे धरण नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश खासदार नरेश मस्के यांनी यावेळी दिले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475