जिल्हा

५२ अतिधोकादायक इमारती; वीज-पाणीजोडणी खंडित करणार

५२ अतिधोकादायक इमारती; वीज-पाणीजोडणी खंडित करणार
५२ अतिधोकादायक इमारती; वीज-पाणीजोडणी खंडित करणार फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबईत ५०४ धोकादायक इमारती नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 504 इमारती या धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. यातील ५२ इमारती अतिधोकादायक असून त्यांची पाणी आणि वीजजोडणी खंडित करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. महानगरपालिका क्षेत्रात एकूण 504 इमारती या धोकादायक असून यात अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तत्काळ निष्कासित करणे अशा ‘सी-1’ प्रवर्गामध्ये मोडणा-या 52 इमारती आहेत. इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरूस्ती करणे अशा ‘सी-2 ए’ प्रवर्गामध्ये मोडणा-या 102 इमारती आणि इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरूस्ती करणे अशा ‘सी-2 बी’ प्रवर्गामध्ये मोडणा-या 297 इमारती त्याचप्रमाणे इमारतीची किरकोळ दुरूस्ती या ‘सी-3’ प्रवर्गामध्ये मोडणा-या 53 इमारती, अशाप्रकारे एकूण 504 धोकादायक इमारतींची यादी घोषित करण्यात आलेली आहे. घोषित इमारतींमध्ये वास्तव्य करणारे मालक-भोगवटादार यांना ते राहत असलेली इमारत निवासी-वाणिज्य वापराकरिता धोकादायक असलेबाबत आणि या इमारतींमधील निवासी-वाणिज्य वापर तात्काळ थांबविणेबाबत तसेच धोकादायक इमारतींचे बांधकाम विनाविलंब तोडून टाकणेबाबत महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग यांचेकडील शासन परिपत्रकानुसार लेखी सूचना-नोटीस देण्यात आलेल्या आहेत. ‘सी-1’ प्रवर्गातील इमारतीची वीज व जलजोडणी खंडीत करण्यात येईल, असेही यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475