जिल्हा

राजकीय फायद्यासाठी टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार

राजकीय फायद्यासाठी टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार
राजकीय फायद्यासाठी टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार फोटो: ठाणे वैभव

माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे सडेतोड प्रत्युत्तर

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही असे माजी महापौर, शिवसेना नेत्या मिनाक्षी शिंदे यांनी आज स्पष्ट केले. केवळ शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत, त्यांच्यासोबत काम करत असल्यामुळे राजकीय स्वार्थापोटी आपल्याला या प्रकरणात अडकवले जात असल्याचा दावा मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.

मीनाक्षी शिंदे यांनी स्पष्ट केले की, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि तपासात कोणताही अडथळा येऊ नये अशी आमची भूमिका आहे. चौकशीला सामोरे जाण्याची  आमची तयारी आहे. पोलिस आम्हाला चौकशीसाठी बोलवणार असतील, तर त्यांना संपूर्ण सहकार्य करण्यास आणि चौकशीला सामोरे जाण्यास आम्ही तयार असल्याचे मीनाक्षी शिंदे यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात घाणेरडे राजकारण पाहायला मिळत आहे. पुरावे नसताना देखील बिनबुडाचे आरोप माझ्या आणि माझ्या पतीवर केले जात असल्याचे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, जर केवळ नाव आले म्हणून अटक करायची असेल, तर दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे नाव आले होते, मग त्यांनाही अटक करणार का? असा सवाल मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषदेचे उपस्थित केला. 

माझ्या प्रभागात प्रत्येक व्यक्तीशी माझा जवळचा संबंध आहे. प्रदीप पुर्णेकर यांची झालेली हत्या दुर्दैवी आहे. प्रभागातील लोकप्रतिनिधी म्हणून मला दुःख आहेच, मात्र याचे भांडवल करून पुर्णेकर यांच्या कुटुंबाला भडकावून पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. हे गलिच्छ राजकारण येथेच थांबवावे, असे यावेळी मिनाक्षी शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475