जिल्हा

ग्रिहिथाकडून ३८०० मिटर उंचीवरील केदारकंठा शिखर सर

ग्रिहिथाकडून ३८०० मिटर उंचीवरील केदारकंठा शिखर सर
ग्रिहिथाकडून ३८०० मिटर उंचीवरील केदारकंठा शिखर सर फोटो: ठाणे वैभव
प्रजासत्ताक दिनी नवा विक्रम ठाणे : ठाण्यातील गिर्यारोहण क्षेत्रातील 10 वर्षीय ग्रिहीथा विचारेने भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी, उत्तराखंडच्या ३८०० मिटर उंचीवरील केदारकंठा शिखरावर यशस्वीरित्या भारतीय तिरंगा फडकवला. ग्रिहीथाचा अतुलनीय प्रवास 22 जानेवारी 2025 रोजी मुंबईतून सुरू झाला. शिखरावर पोहोचण्यासाठी तिने उणे १० अंश सेल्सिअस ते उणे ४ अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानाला तोंड देत आव्हानात्मक भूप्रदेशातून चढाई केली. भारताच्या प्रजासत्ताक दिनी केदारकांठा शिखरावर चढणारी आणि भारतीय तिरंगा फडकवणारी ग्रिहीथा ही सर्वात तरुण भारतीय बनली आहे. ग्रिहीथाची प्रभावी गिर्यारोहण कारकीर्द सहा वर्षे पाच महिने वय असताना सुरू झाली. तिला अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत, नऊ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एक एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तिच्याकडे आहेत. तिने ह्या आधी सह्याद्रीतले अनेक कठीण ट्रेक, किल्ले व सुळके सर केले आहेत. तिच्या उल्लेखनीय कामगिरीमध्ये आठ वर्षांच्या वयात एव्हरेस्ट बेस कॅम्प, नवव्या वर्षात माउंट किलिमांजारो, टांझानिया, मलेशियातील माउंट किनाबलु आणि वयाच्या १०व्या वर्षी माऊंट बाजारदुझू, रशिया/अझरबैजान शिखरे सर करणारी सर्वात तरुण भारतीय आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475