महेश पाटील, दिव्यांशू पाटील यांना सुवर्ण, कर्तव्या भवारला कांस्य
कल्याण : कल्याण पश्चिमेतील वाडेघर येथील साई फिटनेस जिमच्या खेळाडूंनी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
८ ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान दिल्ली हाट, प्रितमपुरा येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत साई फिटनेस जिमचे मालक महेश पाटील, दिव्यांशू पाटील आणि कर्तव्या भवार यांनी पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत महेश पाटील यांनी पॉवरलिफ्टिंग-बेंच प्रेस प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवले. तसेच दिव्यांशू पाटील यांनी ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. कर्तव्या भवार हिने पॉवरलिफ्टिंग-बेंच प्रेस स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक जिंकले.