जिल्हा

आटगावजवळ भीषण अपघात;चौघांचा मृत्यू

आटगावजवळ भीषण अपघात;चौघांचा मृत्यू
आटगावजवळ भीषण अपघात;चौघांचा मृत्यू फोटो: ठाणे वैभव

ट्रकच्या सांगाड्यावर आदळून कारमधील सहाजण जखमी

शहापूर: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेऊन मुंबईकडे परतणाऱ्या भाविकांच्या इर्टिगा कारचा आटगाव येथे बुधवारी भीषण अपघात झाला. कारचा ब्रेक फेल होऊन स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला तीन ते चार वर्षांपासून उभ्या असलेल्या आगीत जळालेल्या ट्रकच्या सांगाड्यावर जाऊन आदळली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त सर्वजण जोगेश्वरी, मुंबई येथील रहिवासी असून त्यांचे मूळ गाव गोरखपूर आहे. एकूण दहा जण इर्टिगा कारमधून नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून मुंबईकडे परतत असतांना आटगाव येथे हा भीषण अपघात घडला.

या अपघातात श्रीराम जैस्वाल, आयुष जैस्वाल, लाडो जैस्वाल आणि सुरज जैस्वाल यांचा मृत्यू झाला. तर सुभी जैस्वाल, शिवम जैस्वाल, हाशिक जैस्वाल, सुनीता जैस्वाल, राधिका जैस्वाल आणि सतीश जैस्वाल हे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच शहापूर पोलीस निरीक्षक विलास कदम, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक अशोक बी. पवार, पोलीस हवालदार संजय आवटे आणि पोलीस हवालदार दगडू वाकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी व स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना उपचारासाठी रवाना केले.अपघाताचा पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहेत.

आगीत जळालेल्या ट्रकचा सांगाडा तब्बल चार वर्षांपासून महामार्गाच्या कडेला तसाच उभा असल्याने त्याच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या इर्टिगा कारचा ब्रेक फेल होऊन स्टेअरिंग लॉक झाल्यानंतर ही कार याच ट्रकच्या सांगाड्यावर आदळली. या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. दरम्यान महामार्गाच्या कडेला वर्षानुवर्षे धोकादायक अवस्थेत उभा असलेला हा सांगाडा वेळेत हटवला असता तर कदाचित हा जीवघेणा अपघात टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475