जिल्हा

पूर्णेकर हत्या प्रकरणी माजी महापौरांच्या पतीची चौकशी

पूर्णेकर हत्या प्रकरणी माजी महापौरांच्या पतीची चौकशी
पूर्णेकर हत्या प्रकरणी माजी महापौरांच्या पतीची चौकशी फोटो: ठाणे वैभव

ठाणे: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणात ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने शिंदे गटाच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची सहा तास चौकशी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत कुणालाही सोडणार नाही असे स्पष्ट केल्यानंतर तपासाला वेग आला आहे.

प्रदीप पूर्णेकर यांची त्यांच्या कार्यालयात घुसून पाच जणांनी निर्घृण हत्या केली होती. हल्लेखोरांनी दोन बंदुकांमधून गोळ्या झाडण्यासह तीन चॉपरनेही वार केले होते. या हत्याकांडामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पूर्णेकर यांचे बंधू तथा माजी नगरसेवक जयनाथ पूर्णेकर आणि प्रदीप यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी या हत्याप्रकरणी मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप केले होते.

या दोघांची नावे प्रथम माहिती अहवालात (एफआयआर) समाविष्ट केल्याशिवाय प्रदीप पूर्णेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका पूर्णेकर कुटुंबीयांनी घेतली होती. या प्रकरणावरून आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर पोलिसांनी पुरवणी जबाबात मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या नावांचा समावेश केला होता.

या हत्याप्रकरणात प्रत्यक्ष सहभाग असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. याशिवाय एका तरुणीसह बांधकाम व्यावसायिकांचीही चौकशी करण्यात आली होती. मात्र, शिंदे दाम्पत्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले नव्हते. अखेर मंगळवारी दुपारी राजेंद्र शिंदे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. पोलिसांनी सहा तास केलेल्या चौकशीत काय माहिती मिळाली आणि त्यातून तपासाला कोणते वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475