क्रीडा

भारतीय महिला क्रिकेट संघ इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर

भारतीय महिला क्रिकेट संघ इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर
भारतीय महिला क्रिकेट संघ इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर फोटो: ठाणे वैभव
आजपर्यंत, भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड महिला क्रिकेट संघाविरुद्ध कधीही द्विपक्षीय टी-20 मालिका जिंकलेली नाही. सध्या सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतलेला भारतीय महिला क्रिकेट संघ इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. आत्मविश्वासाने भरलेला असा हा भारतीय संघ, दोन सामने गमावलेल्या इंग्लंडविरुद्ध पुन्हा एकदा विजयाचा झेंडा फडकावण्यास उत्सुक असेल. इंग्लंड आणि भारत शुक्रवारी लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी एकमेकांसमोर येतील. भारतीय महिला क्रिकेट संघ जर या चकमकीत विजयी झाला तर तो मालिका तर जिंकेलच पण त्याचसोबत इंग्लंडवर टी-20 मालिकेत पहिल्यांदाच मात करून इतिहास रचेल. दुसरीकडे, इंग्लंड महिला क्रिकेट संघ त्यांची हरवलेली लय शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करतील आणि मालिका जीवित ठेवण्याचा ध्येय ठेवतील.   संघ इंग्लंड: नॅटली सिव्हर-ब्रंट (कर्णधार)*, एम अर्लॉट, टॅमी बोमाँट (यष्टीरक्षक), लॉरेन बेल, अ‍ॅलिस कॅप्सी, चार्ली डीन, सोफिया डन्कली, सोफी एक्लस्टन, लॉरेन फायलर, एमी जोन्स (यष्टीरक्षक), पेज शोलफिल्ड, लिंसी स्मिथ, डॅनी वायट-हॉज, इस्सी वाँग *डाव्या मांडीच्या दुखापतीमुळे नॅटली सिव्हर-ब्रंट भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्याला मुकणार आहे. सिव्हर-ब्रंटच्या अनुपस्थितीत टॅमी बोमाँट इंग्लंडचे नेतृत्व करेल. भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हर्लिन देओल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, राधा यादव, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सातघरे   आमने-सामने भारत आणि इंग्लंडने एकमेकांविरुद्ध एकूण 32 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. त्यापैकी इंग्लंडने 22 तर भारताने 10 सामने जिंकले आहेत. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांत इंग्लंड 8-6 ने आघाडीवर आहे.   कोणत्या खेळाडूंवर लक्ष असेल टॅमी बोमाँट: इंग्लंडच्या या उजव्या हाताच्या मधल्या फळीतील फलंदाजाने भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात एक शानदार अर्धशतक झळकावले. नंबर चारवर फलंदाजी करताना तिने 35 चेंडूत 154च्या धमाकेदार स्ट्राइक रेटने 54 धावा केल्या. तिच्या खेळीत आठ चौकारांचा आणि एका षटकाराचा समावेश होता. लॉरेन बेल: इंग्लंडची ही 6 फूट उंच असलेली उजव्या हाताची वेगवान गोलंदाज आतापर्यंत या मालिकेत प्रभावी ठरली आहे. तिने दोन सामन्यांत पाच विकेट्स पटकावल्या आहेत. 'शार्ड' (युनायटेड किंग्डममधील सर्वात उंच इमारत) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेलने सातत्यपूर्ण गोलंदाजी करून चमकदार कामगिरी बजावली आहे. तिच्याकडे गती परिवर्तन करण्याची जबरदस्त क्षमता आहे आणि त्याच्या जोरावर ती कोणत्याही फलंदाजाला सतावू शकते. जेमिमा रॉड्रिग्ज: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताच्या या 'मूर्ती लहान पण कीर्ती महान' फलंदाजाने तिचे 13वे टी-20 अर्धशतक नोंदवले. मुंबईच्या या शानदार फलंदाजाने 154च्या प्रभावी स्ट्राइक रेटने 41 चेंडूत 63 धावा केल्या. तिच्या खेळीत नऊ चौकारांचा आणि एका षटकाराचा समावेश होता. अमनजोत कौर: नंबर पाचवर आलेल्या या उजव्या हाताच्या फलंदाजाने रॉड्रिग्जसोबत मिळून इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 93 धावांची भागीदारी केली. पॉवरप्लेमध्येच संघाला तिची गरज भासली, आणि दबावाखाली न येता अमनजोतने डाव सावरला. या 24 वर्षीय खेळाडूने 40 चेंडूत नाबाद 63 धावा केल्या. तसेच गोलंदाजी करताना तिने तीन षटकांत 28 धावा देऊन एक विकेट घेतली. तिच्या अप्रतिम अष्टपैलू कामगिरीला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.   सामन्याची थोडक्यात माहिती दिनांक: 4 जुलै 2025 वेळ: रात्री 11:05 वाजता ठिकाण: केनिंगटन ओव्हल, लंडन प्रक्षेपण: सोनी स्पोर्ट्स नेटवर्क  

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475