जिल्हा

ठाण्यात एचएसआरपीसाठी एक लाख ६८ हजार ऑनलाईन अर्ज

ठाण्यात एचएसआरपीसाठी एक लाख ६८ हजार ऑनलाईन अर्ज
ठाण्यात एचएसआरपीसाठी एक लाख ६८ हजार ऑनलाईन अर्ज फोटो: ठाणे वैभव
ठाणे: राज्यातील सर्वच वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवणे आता शासनाने बंधनकारक केल्याने ठाणे जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावर आतापर्यंत तब्बल एक लाख ६८ हजार वाहनधारकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केले आहेत. बनावट नंबर प्लेटमुळे होणारे गुन्हे, चोरीची वाहने, चुकीची ओळख आणि वाहतुकीशी संबंधित अनेक गुंतागुंतीचे प्रश्न लक्षात घेत, महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ४ डिसेंबर २०२४ रोजी शासनाने आदेश जारी केला असून, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनधारकांना नवीन एचएसआरपी बसवणे आवश्यक आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला गती मिळाली असून, आत्तापर्यंत एक लाख ६८ हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी एक लाख ४३ हजार वाहनधारकांना अपॉइंटमेंट देण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे एक लाख वाहनधारकांनी आपल्या वाहनावर नवीन एचएसआरपी यशस्वीरित्या बसवले असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याच्या कामासाठी परिवहन विभागाने तीन अधिकृत कंपन्यांची नेमणूक केली आहे. नागरिकांनी अनधिकृत विक्रेत्याकडून अशा प्लेट बसवू नयेत कारण अशा नंबर प्लेटची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होत नाही. त्यामुळे त्याचे कायदेशीर महत्त्व राहत नाही. परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, १५ ऑगस्ट २०२५ नंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळ न घालवता अधिकृत संकेतस्थळावर जाऊन एचएसआरपीसाठी ऑनलाईन अर्ज भरावा, अपॉइंटमेंट घ्यावी आणि आपल्या वाहनावर ही प्लेट बसवून घ्यावी. हे करण्यासाठी www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करावे, वाहनाचा तपशील भरावा, वेळ आणि केंद्र निवडून अपॉइंटमेंट बुक करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. वाहन सुरक्षा आणि कायदेशीर नोंदणीसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे आता अपरिहार्य झाले आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी जागरूकतेसाठी विविध उपक्रम राबवले जात असून ठाणेकर नागरिकांचा या मोहिमेला उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475