महाराष्ट्र

भक्षाच्या शोधात नाग शिरला कोंबड्यांच्या खुराड्यात

भक्षाच्या शोधात नाग शिरला कोंबड्यांच्या खुराड्यात
भक्षाच्या शोधात नाग शिरला कोंबड्यांच्या खुराड्यात फोटो: ठाणे वैभव
भिवंडी: गुरुवारी भिवंडी तालुक्यातील नांदकर गावात एक भूकेला नाग कोंबड्यांच्या खुराड्यात शिरल्याने एकच खळबळ उडाली होती. व्हायरल व्हिडिओच्या अनुषंगाने नांदकर गावातील वेणुगोपाल राठोड यांच्या घराबाहेरील कोंबड्यांच्या खुराड्यात गुरुवारी सकाळच्या सुमारास भक्षाच्या शोधात अंदाजे साडे चार ते पाच फुटी नाग शिरला होता. त्यामुळे राठोड कुटुंबियांची भीतीने गाळण उडाली होती. याबाबतची माहिती त्यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांना दिली असता त्यांनी घटनास्थळी भेट देत रेस्क्यू करत नागाला जीवदान देवून सुखरूप जंगलात सोडले आहे. नागाने दोन अंडी फस्त केल्याची माहिती बोंबे यांनी दिली असून याचप्रकारे याअगोदरही राठोड यांच्या खुराड्यात नाग कोंबडीच्या अंड्यांच्या खुराड्यात शिरल्याची माहिती यावेळी सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475