महाराष्ट्र
भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या लिपिकाने स्वीकारली लाच
भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या लिपिकाने स्वीकारली लाच
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका येथील लिपिकास लाच स्वीकारताना ठाणे अँटी करप्शन ब्युरो विभागाने ताब्यात घेतले आहे. त्याची गुन्हा नोंद शांतीनगर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे.
यातील तक्रारदार यांच्या आईच्या नावावर असलेली घरपट्टी, तक्रारदार यांच्या नावावर करण्यासाठी त्यांनी प्रभाग समिती क्रमांक चार येथे अर्ज केला होता. संबंधित घरपट्टी नावावर करून देण्यासाठी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने 19 सप्टेंबर 2024 रोजी केलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान आरोपीने तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून प्रथम दहा हजार रुपये आणि काम झाल्यानंतर दहा हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे लाच लुचपत विरोधी पथकाने सापळ्याचे आयोजन केले व आरोपी अजय गायकवाड यांना तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपये स्वीकारताना भिवंडी येथे रंगेहात पकडले.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475