महाराष्ट्र

रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम फोटो: ठाणे वैभव
ठाण्यात भाजपातर्फे रक्तदान शिबीर ठाणे : भाजपाचे नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपा ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष संजय वाघुले यांनी आज आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रेल्वे स्टेशनबाहेरील सॅटीस पुलाखाली झालेल्या या शिबिरात भाजपाचे माजी नगरसेवक-नगरसेविका, पक्षाचे पदाधिकारी, प्रवाशी आणि नागरिकांनीही रक्तदान केले. कोकणात मोठ्या प्रमाणावर रक्तटंचाई जाणवत आहे, ते लक्षात घेऊन भाजपाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज कोकणातील अनेक ठिकाणी एकाच वेळी रक्तदान शिबिरे भरविण्यात आली होती. या शिबिराच्या माध्यमातून पाच हजार बाटल्या रक्त जमा करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यानुसार ठाणे शहरात भाजपातर्फे शिबीर भरविण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी नगरसेवक नारायण पवार, भरत चव्हाण, संदीप लेले, मुकेश मोकाशी, माजी नगरसेविका नम्रता कोळी, प्रतिभा मढवी, कमल चौधरी, परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, राजेश मढवी, सरचिटणीस मनोहर सुगदरे, सचिन पाटील, डॉ. समीरा भारती, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरज दळवी, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सुरेश पाटील, वीरसिंग पारछा, किरण मणेरा, सरचिटणीस प्रशांत कळंबटे, समर्थ नाईक, नताशा सोनकर, शरीफ शेख, वृषाली वाघुले यांच्यासह सर्व मंडल अध्यक्ष, विविध प्रकोष्टचे संयोजक आणि जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. वामनराव ओक रक्तपेढीच्या माध्यमातून संकलित करण्यात आलेले रक्त गरजूंना पुरविण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475