जिल्हा

कौशलनगरमध्ये पाण्यासाठी महिलांची महापालिकेवर धडक

कौशलनगरमध्ये पाण्यासाठी महिलांची महापालिकेवर धडक
कौशलनगरमध्ये पाण्यासाठी महिलांची महापालिकेवर धडक फोटो: ठाणे वैभव

​उल्हासनगर : ऐन नवरात्रोत्सवात उल्हासनगर शहरातील कौशलनगर परिसरात गेल्या चार दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. नळाला पाण्याचा थेंबही नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी थेट उल्हासनगर महापालिका मुख्यालयावर धडक देऊन आंदोलन केले.

विशेष म्हणजे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सभापती दीपा पंजाबी यांच्याच प्रभागात हा पाण्याचा ठणठणाट असल्याने महापालिका प्रशासनाच्या नियोजनावर तीव्र ताशेरे ओढले जात आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, कौशलनगर भागात गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. सणासुदीच्या दिवसांत पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत असून दैनंदिन कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि आपली तक्रार मांडण्यासाठी आलेल्या महिलांना महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी मुख्य प्रवेशद्वारावरच रोखले. त्यामुळे महिलांना संबंधित अधिकाऱ्यांची भेट न मिळाल्याने संतापात अधिकच भर पडली.

​स्थानिक नगरसेविका दीपा पंजाबी या स्वतः पाणीपुरवठा समितीच्या सभापती असतानाही त्यांच्या प्रभाग क्रमांक ९ मधील रहिवाशांना पाण्यासाठी ताटकळत राहावे लागत असल्याने पालिकेच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रशासनाने या भागातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत न केल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475