जिल्हा

ठाण्यात रिंग मेट्रोविरोधात शेकडो रहिवासी रस्त्यावर

ठाण्यात रिंग मेट्रोविरोधात शेकडो रहिवासी रस्त्यावर
ठाण्यात रिंग मेट्रोविरोधात शेकडो रहिवासी रस्त्यावर फोटो: ठाणे वैभव
सर्कल येथून सुरू झाला. या मार्गावरील विविध गृहसंकुलांतील रहिवाशांनी उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेतला.

नाथ पै मार्गावर सध्या आधीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलांना रस्ता ओलांडताना मोठ्या अडचणी येतात. नाथ पै मार्ग हा पूर्णपणे विकसित मार्ग असून, मधल्या विभाजकावर आणि दुतर्फा असलेली हिरवळ, चांगला पदपथ आणि उत्तम रस्ता असे त्याचे सध्याचे सुंदर स्वरूप एलिव्हेटेड मेट्रोमुळे पूर्णपणे नष्ट होईल.

प्रस्तावित रिंग मेट्रोचा मार्ग नाथ पै मार्गावरून न नेता, तो प्रस्तावित फूटहिल रस्त्यावरून वळवावा, किंवा भूमिगत करावा, अथवा अन्य कोणत्याही पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली.

या मोर्चात व्हॅली टॉवर, ऍक्मे ओझोन, ईडन वूड्स, हिरानंदानी मेडोज, हरसिद्ध पार्क, निहारिका, लोकपुरम, अशर, अशर एज, वसुंधरा, ग्लेंडेल, लोक उपवन, अशर इन्फिनिटी, हिरानंदानी इस्टेट तसेच नाथ पै मार्गावरील आणि वसंत विहार येथील व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475