जिल्हा

६४ सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेणार

६४ सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेणार
६४ सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेणार फोटो: ठाणे वैभव
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान
ठाणे: मे 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या 64 वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यासाठी नियुक्तीपत्रे तयार करण्यात आली आहेत. यापैकी प्रतिनिधीक स्वरूपात 10 जणांना महापौर दालनात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप तसेच आस्थापना अधीक्षक राधिका कांबळे उपस्थित होते.
सफाई कर्मचाऱ्यांचा वारसा हक्क आणि अन्य प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापौरांनी प्रशासनासोबत विशेष बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत नियुक्ती प्रक्रिया पूर्ण केली. आज प्रातिनिधीक स्वरुपात 10 जणांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली असून उर्वरित जणांना प्रशासनामार्फत नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांमध्ये तसेच त्यांच्या वारसांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, महापालिका आयुक्त सौरभ राव तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475