जिल्हा

युपीएससीच्या वनसेवा परीक्षेत अधिश तिवारी यांना ४४वी रँक

युपीएससीच्या वनसेवा परीक्षेत अधिश तिवारी यांना ४४वी रँक
युपीएससीच्या वनसेवा परीक्षेत अधिश तिवारी यांना ४४वी रँक फोटो: ठाणे वैभव
ठामपाच्या सी.डी. देशमुख प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी
ठाणे: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या युपीएससी फॉरेस्ट सर्विस एक्सामीनेशन २०२५ या स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल ८ मे २०२६ रोजी जाहीर झाला. या परीक्षेत ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी अधिश तिवारी यांनी ऑल इंडिया रँक ४४ मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर अधिश तिवारी यांनी हे यश मिळविले आहे. त्यांच्या या यशामुळे केवळ त्यांच्या कुटुंबाचेच नव्हे, तर चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, ठाणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अधिश तिवारी यांनी आयआयटी मुंबई येथून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. आयआयटी मुंबई ते युपीएससी फॉरेस्ट ऑफिसर हा प्रवास सांगताना त्यांनी नमूद केले की, “माझ्या या यशामध्ये चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. संस्थेमुळेच मी युपीएससी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट मुलाखत परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकलो. संस्थेमधील स्पर्धा परीक्षेचे वातावरण अत्यंत पोषक असून प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध आहे.”
तसेच त्यांनी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा विशेष उल्लेख केला. प्रीलिम्स आणि मेन्स टेस्ट सिरीज, ऑप्शनल सब्जेक्ट गायडन्स अँड टेस्ट सिरीज तसेच मॉक इंटरव्ह्यू या उपक्रमांचा मला मोठा फायदा झाला. त्यामुळेच मी या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करू शकलो,” असे त्यांनी सांगितले. याबद्दल त्यांनी महापालिका प्रशासन, संस्थेचे संचालक महादेव जगताप, समन्वयक गिरीश झेंडे, ग्रंथपाल अपूर्वा घाग तसेच संस्थेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
अधिश तिवारी यांच्या यशामुळे संस्थेतील विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, भविष्यातही ते देशसेवेत उल्लेखनीय कार्य करतील, असा विश्वास संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी व्यक्त केला आहे.
अधिश तिवारी यांचे महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475