जिल्हा

'मविआ'च्या बैठकीला अर्ध्या आमदारांची दांडी

'मविआ'च्या बैठकीला अर्ध्या आमदारांची दांडी
'मविआ'च्या बैठकीला अर्ध्या आमदारांची दांडी फोटो: ठाणे वैभव
* ठाकरे गटाचे १४ आमदार उपमुख्यमंत्री शिंदे यांना भेटल्याची चर्चा * ठाकरे-पवार-सपकाळांची धडधड वाढली मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नऊपैकी तब्बल सहा खासदार फुटल्याने आधीच अडचणीत आलेल्या महाविकास आघाडीला पुन्हा एकदा मोठा एकदा हादरा बसला. बुधवारी महाविकास आघाडीच्या बैठकीत २३ आमदारांनी दांडी मारल्याने काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या नेत्यांची धडधड वाढली आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे १४ आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अज्ञातस्थळी भेटल्याची चर्चा सुरू झाल्याने आघाडीच्या तंबूत खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीला तब्बल 23 आमदारांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे. त्यात अनुपस्थित राहिलेल्या 23 आमदारांपैकी 16 आमदारांची नावे आणि पक्ष समोर आले आहेत. काँग्रेसचे सहा तर ठाकरे आणि पवारांचे प्रत्येकी पाच आमदार अनुपस्थित होते. यात मविआतील तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचाही समावेश आहे. उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेत मविआची पुन्हा एकदा मूठ बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबईत मविआची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला उद्धव ठाकरे, संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील, शशिकांत शिंदे हे नेते उपस्थित होते. पण या बैठकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांसह तब्बल 23 आमदारांनी पाठ फिरवल्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. मविआच्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील, रोहित पवार, अभिजीत पाटील, संदीप क्षीरसागर हे प्रमुख आमदार नव्हते. तर काँग्रेसच्या नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, अस्लम शेख, विश्वजित कदम, विकास ठाकरे या आमदारांनी या बैठकीला दांडी मारल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: या महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित असतानाही त्यांचे काही आमदार गैरहजर राहिले. त्यात सुनील राऊत, गजानन लवटे, बाबाजी काळे, राहुल पाटील, संजय दरेकर या आमदारांचा समावेश आहे. यातील दरेकर आणि राहुल पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवालयमधील बैठकीलाही दांडी मारल्याचे समोर आले होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475