जिल्हा

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’ होणार ऑगस्टमध्ये

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’ होणार ऑगस्टमध्ये
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’ होणार ऑगस्टमध्ये फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने 32 वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचे ऑगस्टमध्ये होणार असल्याची घोषणा आज झालेल्या बैठकीत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली. तब्बल सात वर्षापूर्वी सन 2019 मध्ये ‘ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’ झाली होती. महापालिकेत सात वर्षांनी महापौर विराजमान झाल्यानंतर ही ‘ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’ होत असल्यामुळे यंदा ही मॅरेथॉन मोठ्या जल्लोषात होणार असल्याचे महापौरांनी नमूद केले. कै. अरविंद पेंडसे सभागृहात ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनची बैठक महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, महापालिका आयुक्त सौरभ राव, शिवसेना गटनेते पवन कदम, राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे (अजित पवार गट) नजीब मुल्ला, नगरसेवक राम रेपाळे, नगरसेविका मर्जिया पठाण, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्‌त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, मीनल पालांडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दीपक शिंदे आदी उपस्थित होते. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या सहकार्याने पार पडणार आहे. लवकरच या स्पर्धेची तारीख जाहिर करण्यात येणार असून ठाणे महापालिका मुख्यालयात मॅरेथॉन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉनपटूंसह ठाणेकर नागरिक या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने व उत्साहाने सहभागी होतील या दृष्टीने सर्व तयारी करण्याच्या सूचना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी बैठकीत दिल्या. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ही शहराची मॅरेथॉन असून या स्पर्धेत डॉक्टर्स, वकील, सिनेकलाकार, माजी लोकप्रतिनिधी, महापालिकेचे माजी अधिकारी अशा विविध क्षेत्रातील नागरिकांना सहभागी करुन घेतले जाणार आहे. यासाठी या स्पर्धेची माहिती सर्व स्तरांमध्ये पोहचण्याच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या. 32 व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत विविध गट असतील. राज्यस्तरीय गटामध्ये खुला गट (महिला व पुरुष)- 21 किमी, 18 वर्षावरील (महिला व पुरुष)- 10 किमी, 18 वर्षाखालील (मुले व मुली)- 10 किमी असे विभाग आहेत. तर, जिल्हास्तरीय गटात 15 वर्षाखालील (मुले व मुली)- 05 किमी, 12 वर्षाखालील (मुले व मुली)- 03 किमी, ज्येष्ठ नागरिक (पुरुष आणि महिला) - 500 मीटर या गटांचा समावेश असल्याची माहिती उपायुक्त मीनल पालांडे यांनी बैठकीत दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475