जिल्हा

कालबाह्य अन्नपदार्थ : ॲमेझॉनच्या व्यवस्थापकासह दोघांवर गुन्हा

कालबाह्य अन्नपदार्थ : ॲमेझॉनच्या व्यवस्थापकासह दोघांवर गुन्हा
कालबाह्य अन्नपदार्थ : ॲमेझॉनच्या व्यवस्थापकासह दोघांवर गुन्हा फोटो: ठाणे वैभव
अन्न औषध प्रशासनाची भिवंडीत कारवाई ठाणे : भिवंडीतील सरलगाव परिसरातील ॲमेझॉन कंपनीने कालबाह्य आणि मानवी आरोग्यास घातक अन्नपदार्थ नष्ट करण्याऐवजी ते बाजारात विक्रीसाठी पाठविल्याप्रकरणी अन्न औषध प्रशासनाने गोदामावर कारवाई करत व्यवस्थापकासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. अन्न व औषध प्रशासनाने काही दिवसांपुर्वी भिवंडी येथील माणकोली-दापोडे भागात विनापरवाना सौंदर्यप्रसाधनाच्या वस्तुंचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून कारवाई केली होती. त्यापाठोपाठ आता पुन्हा भिवंडीतील ॲमेझाॅन कंपनीच्या एका गोदामावर धाड टाकून कारवाई केली असून याप्रकरणी ठाणे येथील अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडी तालुक्यातील सरवली गाव येथील ॲमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि.च्या वितरण केंद्रात अन्न व औषध प्रशासन विभागाने २४ जून २०२६ रोजी तपासणी केली. या तपासणीत कालबाह्य आणि खराब अन्नपदार्थांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी ते पुन्हा बाजारात विक्रीसाठी वळविण्यात आल्याचे निष्पन्न झाले. आर. के. ट्रेडर्सचे मालक रहमान के. यांनी करारातील अटींचे पालन केले नाही आणि अन्नपदार्थांची विल्हेवाट लावल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर केले. तसेच ॲमेझॉन रिटेल इंडियाचे पश्चिम विभागाचे फॅसिलिटी मॅनेजर सोमशेखर बसवराज कोन्नुर आणि कालबाह्य अन्नपदार्थांच्या विल्हेवाट प्रक्रियेशी संबंधित कर्मचाऱ्यांचा या प्रकारात सहभाग असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे, असे ठाणे येथील अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद वसंत कांडेलकर यांनी पोलिस तक्रारीत म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475