जिल्हा

सातासमुद्रापार दुबईतही गणरायाचा जयघोष

सातासमुद्रापार दुबईतही गणरायाचा जयघोष
सातासमुद्रापार दुबईतही गणरायाचा जयघोष फोटो: ठाणे वैभव

कल्याण: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी समाजातील नागरिकांना संघटित करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आता सातासमुद्रापारही मोठ्या उत्साहाने जपली जात आहे. यंदाही दुबई येथे इंस्पायर इव्हेंट्ससह विविध सामाजिक संघटना, कंपन्या, सांस्कृतिक मंडळे आणि मित्रपरिवार यांच्या संयुक्त सहकार्याने भव्य सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

दुबईतील पॅव्हेलियन पॅलेस हॉटेल येथे श्रीमंत ढोल-ताशा पथकाच्या गजरात गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन झाले. त्यानंतर विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दिवसभर भजन, सामूहिक गणेश जप, दुपारची आरती, अथर्वशीर्ष पठण तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सायंकाळच्या आरतीनंतर गणेश भजन आणि जागरणाने वातावरण भक्तिमय झाले.

दुसऱ्या दिवशी गणेश पूजन व आरती, भजन, सामूहिक गणेश जप तसेच सायंकाळी भव्य मिरवणूक काढून गणेश विसर्जन आणि सांगता आरती करण्यात आली. दुबईत यंदा या सार्वजनिक गणेशोत्सवाचे तिसरे वर्ष असून, हजारो भाविकांनी एकत्र येत गणरायाची सेवा केली. परदेशात राहूनही भारतीय संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्याचा संदेश या उत्सवाच्या माध्यमातून देण्यात आला. सर्वांच्या सहकार्यामुळे सातासमुद्रापार भव्य स्वरूपात गणेशोत्सवाचे आयोजन शक्य झाल्याचे या उत्सवाचे आयोजक चंद्रशेखर जाधव यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475