जिल्हा

कोस्टल रोडची वर्षपूर्ती: धावू लागली दोन लाख वाहने!

कोस्टल रोडची वर्षपूर्ती: धावू लागली दोन लाख वाहने!
कोस्टल रोडची वर्षपूर्ती: धावू लागली दोन लाख वाहने! फोटो: ठाणे वैभव

मुंबई: धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्ग अर्थात कोस्टल रोड २४ तास सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. २४ तास खुला करण्यात आल्यानंतर या मार्गावरील वाहतुकीमध्ये तब्बल ६६ टक्यांवरुन ८१ टक्के वाढ झाली असून दरमहा वाहनांची संख्या एक लाख ९० हजारांवर पोहोचली आहे. यामुळे ठाणे-मुंबईकरांचा वेळ आणि इंधन दोन्हीची बचत होत आहे.

सुरुवातीच्या काळात सागरी किनारी मार्गावर ठराविक वेळेतच वाहतूक सुरू होती. त्यानंतर १५ ऑगस्ट, २०२५ पासून कोस्टल रोड २४x७ वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या मार्गावरील सरासरी दैनंदिन वाहतूक जवळपास ८१ टक्यांनी वाढली आहे. पूर्वी दररोज सुमारे ३४,५०० वाहने प्रवास करीत होती. आता वाहनांची संख्या ६२,६४० पर्यत पोहोचली आहे. दरम्यान या मार्गावरून एका दिशेने सुमारे ६८ हजार गाड्यांची वाहतूक अपेक्षित होती. मात्र अद्याप तेवढी वाहने धावत नाहीत.

२४ तास वाहतूक सुरू होण्यासाठी मार्च २०२४ पासून टप्प्याटप्प्याने खुला झालेला कोस्टल रोड वाहनचालकांसाठी दिवसातून केवळ १६ तास, सकाळी ७ ते मध्यरात्रीपर्यंत उपलब्ध होता. या काळात, दक्षिणेकडे सरासरी १९,२०९ आणि उत्तरेकडे १५,३३० म्हणजेच एकूण ३४,५३८ वाहने धावत होती. कोस्टल रोड २४ तासांसाठी खुला झाल्यानंतर दक्षिणेकडे ३३,०७७ आणि उत्तरेकडे २९,५६३ वाहने वाढली. ज्यामुळे एकूण वाहनांची संख्या ६२,६४० झाली. १५ ऑगस्ट २०२५ पूर्वी, या रस्त्यावर दरमहा सरासरी सुमारे ११.३५ लाख (दक्षिणेकडे ५.७६ लाख आणि उत्तरेकडे ५.५८ लाख) वाहनांची ये-जा नोंदवली होती. रस्ता २४ तास खुला झाल्यापासून एका वर्षात, ही संख्या दरमहा ६६ टक्यांनी म्हणजेच जवळपास १८.८ लाख वाहनांपर्यंत वाढली आहे.

कोस्टल रोड बांधण्यासाठी १३,९८४ कोटीचा खर्च झाला आहे. मात्र या प्रकल्पाने अद्याप पूर्ण क्षमता गाठलेली नाही. नियोजनाच्या वेळी केलेल्या अंदाजापेक्षा वाहतुकीचे प्रमाण अजूनही खूपच कमी आहे. सध्या या रस्त्यावरून मूळ अपेक्षेच्या तुलनेत केवळ अर्धीच वाहतूक होत आहे.

२४x७ पूर्वी दररोजची वाहने ३४,५३८ तर २४x७ नंतरची दररोज ६२,६४० अशी अंदाजित ६८ हजार वाहने धावली. मार्च २०२४ पासून आतापर्यंत एकूण ४१ कोटी वाहने धावली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475