जिल्हा

नटसम्राटाचे 'गमन'

नटसम्राटाचे 'गमन'
नटसम्राटाचे 'गमन' फोटो: ठाणे वैभव

कुणी घर देता का घर... कुणी घर देता का घर? एका वादळाला राहण्याचं घर हवंय... एका तुफानाला हक्काचं घर हवंय! माणसाच्या या अथांग आणि अफाट गर्दीत... माणसाला राहण्याचं घर हवंय. कुणी घर देता का घर? जगाच्या या अवाढव्य रंगभूमीवर मी माझं नाटक संपवलंय. पण आता मला माझी विश्रांतीची जागा हवीय. माझ्या हक्काचं घर हवंय! जिथे मी शांतपणे डोळे मिटू शकेन... कुणी घर देता का घर?"

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज ८ ऑक्टोबर रोजी पहाटे २.३० वाजता वयाच्या ७५व्या वर्षी अकाली निधन झाले. गोव्यातील डोना पावलामधील घरी नाना पाटेकर यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान नाना पाटेकर यांचा मृत्यू झाला.

मणिपाल रुग्णालयाचे कर्करोग विभाग प्रमुख डॉ. शेखर सालकर यांनी 45 मिनिटे सतत सीपीआर देऊनही नाना पाटेकर यांना वाचवता आले नाही. रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने नाना पाटेकर यांना पहाटे 5.20 वाजता मृत घोषित केले. छातीत तीव्र वेदना होत असल्याने एका फ्लॅटवर वैद्यकीय पथक पाठवण्यात आले होते; तिथे ते प्रतिसाद देत नव्हते. त्यांना 'कार्डियाक मसाज' देऊन रुग्णालयात आणले असता, तेथील वैद्यकीय पथकाने पहाटे 5.20 वाजता त्यांना मृत घोषित केले. हे प्रकरण 'मेडिको-लीगल' (वैद्यकीय-कायदेशीर) स्वरूपाचे असल्याने त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.

नाना यांचे खरे नाव विश्वनाथ गजानन पाटेकर. आईचे नाव निर्मला पाटेकर. वडील व्यावसायिक होते. १ जानेवारी १९५१ साली नानांचा रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा येथे जन्म झाला. नाना पाटेकर जेव्हा २८ वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते.  तर, नाना पाटेकर यांची आई गृहिणी होत्या. नाना पाटेकर आपल्या आईच्या अत्यंत जवळ होते. नाना पाटेकर यांच्या आईचं निधन २९ जानेवारी २०१९ रोजी वयाच्या ९९व्या वर्षी झाले.

खडतर जीवनप्रवास

अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी आपल्या कारकि‍र्दीला सुरुवात केली. वयाच्या १३व्या वर्षांपासून ते काम करत होते. आर्थिक चणचणीमुळे सुरुवातीच्या काळात ते केवळ एकच वेळ जेवण करायचे. त्यांचे मासिक उत्पन्न ३५ रुपये होते. त्यांचा खडतर प्रवास सोपा नव्हता. यशाची उंची गाठली असली तरी, त्यांनी कधीही आपला साधेपणा आणि मातीशी जोडलेली नाळ तोडली नाही. 

अभिनयातील कामगिरी

नाना पाटेकर यांची अभिनयाची जडणघडण रंगभूमीवर झाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी मराठी नाटकांमध्ये काम केले. त्यांच्या नाटकांचा उल्लेख करायचा झाला तर, 'पुरुष' मध्ये त्यांनी साकारलेला गुलाबराव आणि 'हमीदाबाईची कोठी' नाटकात साकारलेला सत्तार अजरामर केला. केवळ अभिनयासाठी नाही तर, फिल्म मेकिंग आणि स्क्रिप्ट रायटिंगसाठीही त्यांची विशेष ओळख आहे. नाना पाटेकर यांना तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे 2013 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही गौरवण्यात आले. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीची सुरुवात 'गमन' या चित्रपटातील नकारात्मक भूमिकेतून केली. १९८६ साली रिलीज झालेला 'अंकुश' हा चित्रपट त्यांचा प्रचंड गाजला. 'परिंदा', 'क्रांतिवीर', 'अग्निसाक्षी', 'तिरंगा', 'खामोशी' आणि 'नटसम्राट' यांसारख्या सिनेमातून आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवले.

कारगिल युद्धात सहभाग

१९९०.साली इंडियन टेरिटोरियल आर्मी म्हणून कॅप्टन नाना पाटेकर यांनी जॉइन केलं होतं. त्यांनी 'प्रहार-द फायनल अटॅक'  मध्ये मेजरच्या भूमिकेसाठी तीन वर्षे आर्मीची ट्रेनिंग घेतली. नाना पाटेकर यांनी जनरल व्ही. के सिंह यांच्यासोबतही काम केलं आहे.१९९९ सालच्या कारगिल युद्धादरम्यान, त्यांनी अभिनय क्षेत्र सोडून मराठा लाइट इन्फेंट्री रेजिमेटंमध्ये सेवा बजावली.

नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून डोंगराएवढे कार्य

नाम फाउंडेशन ही नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये सुरू केलेली एक मोठी चळवळ आहे. महाराष्ट्रातील भीषण दुष्काळ, दुष्काळाची भीषणता या पार्श्वभूमीवर या संस्थेची स्थापना करण्यात आली. दुष्काळामुळे गावांची होणारी बिकट अवस्था, वाढत्या शेतकरी आत्महत्या आणि सततचा पाणीप्रश्न या मुख्य समस्यांवर 'नाम फाउंडेशन' उपाय शोधण्याचे काम करते. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, साठवलेले पाणी आणि भूगर्भातील पाणी यांच्या वापरामध्ये संतुलन राखणे, जुने कालवे व रखडलेले पाणी प्रकल्प पुन्हा पूर्ववत करणे या गोष्टींचा समावेश आहे. गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना सन्मानजनक व समृद्ध जीवन जगता यावे यासाठी अनेक प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत, तर अनेक प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहेत. शेतकऱ्यांचे हाल व संकटे दूर करून मानवी भावनांना पाठबळ देणारी 'नाम' ही केवळ एक संस्था न राहता आता एका चळवळीच्या स्वरूपात पुढे आली आहे. वंचित आणि दुष्काळग्रस्त गावांचा विकास घडवून आणणे आणि देशभरातील लोकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करणे हेच 'नाम फाउंडेशन'चे ध्येय आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475