जिल्हा

साहित्यनगरी डोंबिवलीत अकरावे नांदी संमेलन उत्साहात

साहित्यनगरी डोंबिवलीत अकरावे नांदी संमेलन उत्साहात
साहित्यनगरी डोंबिवलीत अकरावे नांदी संमेलन उत्साहात फोटो: ठाणे वैभव
डोंबिवली: सांस्कृतिक आणि साहित्यनगरी अशी ओळख असणाऱ्या डोंबिवलीत अकरावे नांदी संमेलन मोठ्या उत्साहात झाले. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे नांदी संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उपस्थित होते.

या संमेलनात माहिती तंत्रज्ञान, 'एआय आणि साहित्य’ या विषयावर आधारित चर्चासत्रे आणि परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. १००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर या नांदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. एआयमुळे बदलते दैनंदिन जीवन, करिअरच्या संधी आणि रोजगारविश्वावर या संमेलनात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. तसेच तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषा-साहित्याच्या स्थानावर मान्यवरांचे मंथन यशस्वीरीत्या पार पडले. यावेळी डोंबिवलीकर साहित्यप्रेमी, युवा वर्ग आणि नागरिकांचा नांदी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

याप्रसंगी समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, साहित्यिक अरुण शेवते, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, माधव जोशी, प्रा. डॉ. विनय भोळे, महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखेच्या अध्यक्षा डॉ. धनश्री साने, डोंबिवलीकर मासिकाचे कार्यकारी संपादक प्रभू कापसे, कल्याण-डोंबिवलीचे उपमहापौर राहुल दामले, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475