जिल्हा

दिवेआगर येथे समुद्रात बुडून आठ जणांचा मृत्यू

दिवेआगर येथे समुद्रात बुडून आठ जणांचा मृत्यू
दिवेआगर येथे समुद्रात बुडून आठ जणांचा मृत्यू फोटो: ठाणे वैभव

रायगड: आज रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील समुद्र किनारी मोठी दुर्घटना घडली असून आठ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. सर्वजण पुण्यातील आळंदी येथून सहलीसाठी आले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. 

पुण्यातील आळंदी येथून एका खासगी क्लासची सहल पर्यटनासाठी आली होती. त्यातील आठ जण समुद्रकिनारी पाण्यात पोहण्याचा आनंद घेत असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील सर्व आठही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दिवे आगार येथे मृत पावलेले विद्यार्थी हे विनर्स अकॅडमीत शिक्षण घेत होते. ही खाजगी शिकवणी असून ते सर्वजण अकरावीचे शिक्षण घेत होते. ४२ विद्यार्थी आणि दोन शिक्षक असे ४४ जण आज दिवे आगारला ट्रिपसाठी गेले होते. त्यातील आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती आळंदी नगरपरिषदेकडून देण्यात आली. 

दरम्यान, महाकाली वॉटर स्पोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत केली, तसेच स्थानिक नागरिकांनीही सहकार्य केले. मात्र, या दुर्घटनेने समुद्रकिनारी शोककळा पसरली आहे. दुर्घटनेतील सर्व मृतदेह बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, मंत्री भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांनीही प्रशासनाशी संपर्क साधल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475