जिल्हा

मीरा-भाईंदर महापालिकेच्या १० घंटागाड्या धूळखात

मीरा-भाईंदर महापालिकेच्या १० घंटागाड्या धूळखात
मीरा-भाईंदर महापालिकेच्या १० घंटागाड्या धूळखात फोटो: ठाणे वैभव

भाईंदर: महानगरपालिका परिवहन विभागाच्या घोडबंदर बस डेपोत कचरा संकलनासाठी खरेदी करण्यात आलेल्या तब्बल दहा घंटागाड्या वर्षानुवर्षे वापराविना उभ्या असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

बस डेपोत उभ्या असलेल्या या वाहनांवर धूळ साचलेली असून, नियमित वापराअभावी त्यांची अवस्था खराब होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील दैनंदिन जमा होणाऱ्या घन कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी या घंटागाड्या नेमक्या कोणत्या वर्षी खरेदी करण्यात आल्या? त्यासाठी किती निधी खर्च झाला? विशेष निधीतून किती रक्कम उपलब्ध झाली? वाहनांची नोंदणी का झाली नाही? वाहने वापरात आणण्यासाठी कोणती प्रक्रिया प्रलंबित आहे? तसेच इतका काळ त्यांची देखभाल कोणत्या पद्धतीने करण्यात आली? या सर्व प्रश्नांची उत्तरे महापालिका प्रशासनाकडून अपेक्षित आहेत. विशेष निधीतून खरेदी करण्यात आल्याचे वाहनांवर नमूद असल्याने या खरेदीबाबत पारदर्शकता ठेवण्याची मागणीही होऊ शकते.

एकीकडे शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी नवीन वाहनांची आवश्यकता असल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे उपलब्ध घंटागाड्या डेपोत धूळ खात पडल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ही वाहने नेमकी कधीपासून सेवेत दाखल होणार? त्यांच्या नोंदणीची प्रक्रिया कधी पूर्ण होणार? आणि आतापर्यंत झालेल्या नुकसानीची जबाबदारी कोणाची? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.

महापालिका प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ माहिती जाहीर करून वाहनांच्या खरेदीपासून आजपर्यंतचा खर्च, नोंदणीची सद्यस्थिती आणि प्रत्यक्ष वापराचे नियोजन स्पष्ट करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा नागरिकांच्या पैशातून खरेदी केलेली वाहने वापराअभावी खराब होऊन अखेर भंगारात जाण्याची वेळ येऊ नये, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475