जिल्हा

एपीएमसी बाजारात इजिप्तचा कांदा दाखल

एपीएमसी बाजारात इजिप्तचा कांदा दाखल
एपीएमसी बाजारात इजिप्तचा कांदा दाखल फोटो: ठाणे वैभव

स्थानिक कांद्याच्या दरांवर होणार परिणाम

नवी मुंबई: राज्यातील काही भागांत दुष्काळी परिस्थिती असताना कांद्याला चांगला बाजारभाव मिळत होता. मात्र मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) कांदा-बटाटा बाजारात इजिप्तमधून बुधवारी दोन कंटेनरमधून सुमारे ६० टन इजिप्तचा कांदा बाजारात दाखल असून या या कांद्याला ३८ ते ४० रुपये दर मिळत आहे. तर बाजारात स्थानिक कांद्याला ४० ते ५० रुपये दर मिळत असताना इजिप्तचा कांदा दाखल झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.

मुंबई एपीएमसीमध्ये महाराष्ट्रातून बुधवारी सुमारे १९,९५० गोणी स्थानिक कांद्याची आवक झाली. स्थानिक कांद्याला सध्या ४० ते ५० रुपये किलोचा बाजारभाव मिळत आहे. एकीकडे स्थानिक कांद्याला समाधानकारक दर मिळत असताना परदेशातून कांदा आयात करण्याची गरज काय?, असा सवाल शेतकरी प्रतिनिधींकडून उपस्थित केला जात आहे. आयात वाढल्यास दरावर परिणामाची भीती व्यक्त करण्यात आली आहे. स्थानिक कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असतानाच इजिप्तच्या कांद्याची आवक झाल्याने बाजारातील एकूण पुरवठा वाढण्याची शक्यता आहे.

सध्या इजिप्तमधून दोन कंटेनरमधून ६० टन कांदा दाखल झाला असला तरी आगामी काळात सुमारे ४०० कंटेनर कांदा येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आयात मोठ्या प्रमाणात झाल्यास बाजारातील कांद्याचा पुरवठा वाढेल. कमी दरातील आयात कांद्याला मागणी वाढल्यास महाराष्ट्रातील कांद्याची मागणी कमी होऊन दर घसरण्याची शक्यता आहे. इजिप्तच्या कांद्याला मुंबई आणि उपनगरांतील हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. आयात कांद्यापैकी सुमारे ८० टक्के कांदा हा  व्यावसायिकांकडून खरेदी केला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हा कांदा आकाराने मोठा, गोल आणि रंगाने गर्द गुलाबी ते लाल असतो. या कांद्याचे बाहेरील आवरण (साल) अत्यंत कडक आणि जाड असते, ज्यामुळे तो लांबच्या प्रवासात किंवा वाहतुकीत लवकर सडत नाही. हा कांदा चवीला देशी (भारतीय) कांद्यापेक्षा कमी तिखट आणि काहीसा बेचव किंवा उग्र वाटू शकतो. त्यामुळे भारतीय ग्राहकांचा कल यापेक्षा स्थानिक कांद्याकडे असला तरी हॉटेल चालकांचा इजिप्तच्या कांदा खरेदीकडे जास्त कल असतो असतो.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475