जिल्हा

महायुतीतील नाराज इच्छुकांनी धरली आघाडीची वाट

महायुतीतील नाराज इच्छुकांनी धरली आघाडीची वाट
महायुतीतील नाराज इच्छुकांनी धरली आघाडीची वाट फोटो: ठाणे वैभव
कल्याण-डोंबिवलीत अखेरच्या दिवशी एबी फॉर्म दिल्याने गोंधळ कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रस्थापित पक्षाच्या जागा वाटपाची गणिते त्याच पक्षातील बंडाळी पाहता भाजपा व शिवसेना शिंदे गटाने सावध भूमिका घेत उमेदवारांची यादी घोषित न करता उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी एबी फॉर्म दिल्याने उमेदवारांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चांगलीच दमछाक झाली. महायूतीकडून शिवसेना शिंदे गट ६६, भाजपा ५६ जागांवर लढणार असून मनसे ५४ तर शिवसेना उद्धव ठाकरे ६८ जागांवर लढणार आहे. युतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वबळावर लढणार असून त्यांनी ४० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. काँगेस ५८, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ३५ तर वंचित बहुजन आघाडीने १५ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. एकूण ३९२ उमेदवार रिंगणात उभे आहेत. त्यामुळे पालिकेची निवडणूक काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी ३१ पॅनलमधील १२२ जागांसाठी भाजपा, शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीतील भाजपा शिवसेना शिंदे गटाच्या युतीचे जागावाटप झाले आहे. या जागावाटपात भाजपाला ५६ तर शिवसेना शिंदे गटाला ६६ जागा मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेत ४२ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना शिंदे गट व भाजपा युतीने आपल्या पक्षाची उमेदवार यादी जाहीर न करता काहीना सोमवारी रात्री उशिरा तर काहीना मंगळवारी सकाळी पक्षाचे एबी फॉर्मचे वाटप केले. तर दुसरीकडे मनसे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष व त्याचे मित्र पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाची जागा वाटपात बिघाडी झाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने वंचित बहुजन आघाडीबरोबर तिसरी आघाडी करून बाहेर पडले. मनसेने ५४ जागा तर शिवसेना उद्धव ठाकरे गट ६८ जागांवर लढत असून त्यांना उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व वंचित आघाडीने एकत्रित लढण्यासाठी काँग्रेसने ५८,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ३५ तर वंचित बहुजन आघाडी १५ अशा १०८ जागांवर उमेदवार उभे करून त्यांना आपआपल्या पक्षाचे एबी फॉर्म दिल्याने कल्याण डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गट, भाजपा, मनसे, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475