जिल्हा
ठाण्यात मनसेचे २८ उमेदवार; महायुतीला देणार कडवी टक्कर
ठाण्यात मनसेचे २८ उमेदवार; महायुतीला देणार कडवी टक्कर
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला कडवी टक्कर देण्यासाठी मनसेने २८ सुशिक्षित मराठी उमेदवार मैदानात उतरवले आहेत. ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली या २८ शिलेदारांनी आपापले उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल केले.
ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक येत्या १५ जानेवारी रोजी होत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या आघाडीचा सामना प्रस्थापितांसोबत होत आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मनसेच्या २८ उमेदवारांनी जल्लोषात अर्ज दाखल केले.
प्रभाग क्र. ३ (क) मधून निलेश चव्हाण, २ (ड) रविंद्र मोरे, ४ (अ) प्रतिक्षा डाकी, ५ (ड) पुष्कराज विचारे, २० (ब) सविता चव्हाण, २० (क) राजश्री नाईक, १४ (अ) रेश्मा चौधरी, १९ (ब) प्रमिला मोरे, १६ (ब) आरती पाटील, ८ (ड) सचिन कुरेल, १५ (अ) पवनकुमार पडवळ, १६ (क) रश्मी सावंत, ७ (ब) स्वप्नाली खामकर-पाचंगे, २१ (ब) संजीता जोशी, २१ (क) उर्मिला डोंगरे, ११ (क) सीमा इंगळे, १७ (ब) पूजा ढमाळ, १२ (ब) रक्षा मांडवकर, १२ (अ) रूपेश जाधव, १८ (क) प्राची घाडगे, २२ (ब) रविंद्र सोनार, २२ (अ) प्रज्ञा कांबळे, २७ अ प्रकाश पाटील, ब- नीता भगत, क-मयूरी पोरजी, ड-प्रशांत गावड़े आणि प्रभाग क्रमांक २८ ब मधून रेश्मा नरेश पवार आणि क मधून अंकिता कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475