जिल्हा
वनखात्याला बिबट्याची प्रतिकृती भेट देत आंदोलन
वनखात्याला बिबट्याची प्रतिकृती भेट देत आंदोलन
फोटो: ठाणे वैभव
बदलापूर: बदलापूरसह ग्रामीण भागात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला त्वरित जेरबंद करावे या मागणीसाठी पिंजऱ्यातील बिबट्याची प्रतिकृती वनखात्याच्या अधिकाऱ्यांना भेट देऊन बदलापुरात केलेले अनोखे आंदोलन चर्चेचा विषय ठरले आहे.
गेल्या काही दिवसांपासून बदलापूरजवळील काराव आणि आंबेशिव या ग्रामीण पट्ट्यात बिबट्याचा वावर असल्याच्या घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन खात्याकडून बिबट्याला पकडण्याची मागणी केली जात आहे, वनखात्याला याकामी यश आले नाही, याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी आज एका लोखंडी पिंजऱ्यात बिबट्याची प्रतिकृती ठेवत टेम्पोमधून वनखात्याच्या कार्यालयात आणून बिबट्याची प्रतिकृती अधिकाऱ्यांना भेट दिली, परिसरात वावरणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी देशमुख यांनी अधिकाऱ्यांकडे केली. लवकरच बिबट्याला जेरबंद केले जाईल असे आश्वासन वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
वांगणीतल्या पाऊलखुणा बिबट्याच्या?
बदलापूरजवळील वांगणीमध्ये आढळून आलेल्या पाऊलखुणा बिबट्याच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. या परिसरात बिबट्याची विष्ठाही आढळून आली आहे. त्याचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
300x450
300x600