जिल्हा

कामगारांच्या ७५०० रुपयांच्या भत्त्यासाठी उद्या धरणे आंदोलन

कामगारांच्या ७५०० रुपयांच्या भत्त्यासाठी उद्या धरणे आंदोलन
कामगारांच्या ७५०० रुपयांच्या भत्त्यासाठी उद्या धरणे आंदोलन फोटो: ठाणे वैभव

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेतील कामगारांना दरमहा ७ हजार ५०० रुपये नागरी सेवा संचालन विशेष भत्ता देण्याबाबत महासभेने निर्णय घेतला असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने कामगारांमध्ये नाराजी आहे. महासभेच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी २९ सप्टेंबर रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

कामगारांच्या मागण्यांसाठी २३ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, १८ सप्टेंबर रोजी झालेल्या महासभेत महापौरांनी प्रशासनाला १५ दिवसांची मुदत दिल्याने हे आंदोलन आठ दिवसांसाठी स्थगित करण्यात आले. आता मंगळवारी २९ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याचे कामगार संघटनेने स्पष्ट केले आहे. महासभेने कामगारांच्या वेतनवाढीबाबत निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करणे अपेक्षित असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. मात्र, विविध प्रशासकीय प्रक्रिया, अभिप्राय आदी कारणांमुळे अंमलबजावणीला विलंब होत असल्याने कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

महापालिकेची स्वच्छता, आरोग्य आणि विविध नागरी सेवा सुरळीत ठेवण्यात कामगारांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळे महासभेने घेतलेल्या निर्णयाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करून सप्टेंबर २०२६ चे वेतन वाढीव दराने देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

सर्व कामगारांचा आरोग्य व जीवन विमा काढावा. सेवानिवृत्त कामगारांची सेवा उपदानाची रक्कम अदा करावी. सफाई आयोगाच्या निर्देशानुसार १ हजार रुपये धुलाई भत्ता द्यावा. उद्यान विभागातील सेवानिवृत्त सफाई कामगारांच्या वारसांना कामावर नियुक्त करावे. सफाई, माळी व मलेरिया विभागातील क्षेत्रीय कामगारांना अद्ययावत हजेरी शेड उपलब्ध करून द्यावी. कामगारांची आधार-बेस्ड बायोमेट्रिक हजेरी सुरू करावी. मलेरिया व विद्युत विभागातील कामगारांना कुशल कामगार श्रेणीतील वेतन द्यावे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. 

आंदोलनादरम्यान सर्व विभागातील कामगार कामकाज करून आंदोलनस्थळी उपस्थित राहतील. कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही, याची दक्षता घेत सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475