जिल्हा

उपमुख्यमंत्री पवार यांच्या फायलींचा प्रवास ठरला

उपमुख्यमंत्री पवार यांच्या फायलींचा प्रवास ठरला
उपमुख्यमंत्री पवार यांच्या फायलींचा प्रवास ठरला फोटो: ठाणे वैभव
मुंबई : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून आलेली कोणतीही फाईल ही मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर जाण्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासल्यानंतरच पुढे जाईल, असे निर्देश मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले जात आहे. एका वृत्त वाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, "अजित पवार हे मुख्यमंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करतात अशा बातम्या काही दिवसांपूर्वी येत होत्या. पण या हस्तक्षेपावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाप बसवला आहे. कारण अजित पवारांकडून येणाऱ्या फाईल्स या व्हाया देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांकडे जातील, त्यानंतर त्यावर अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेणार आहेत. याबाबत मुख्य सचिवांच्या आदेशांनी शासन निर्णय झाला आहे" सामान्यतः अर्थमंत्रालयाच्या फाईल्स या थेट मुख्यमंत्र्यांकडेच जात असतात. पण आता यामध्ये बदल करुन अजित पवारांच्या आक्रमक भूमिकेवर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चाही सुरु झाली आहे. यावर भाष्य करताना विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "कारण भाजप आणि शिंदे गटाची अर्धी-अर्धी पद राष्ट्रवादीनं घेतलीच आहेत. त्यामुळं गिरीश महाजन यांचीच नव्हे तर गावपातळीवरील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे"

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475