जिल्हा

क्रेन कोसळून रिक्षाचालक आणि प्रवासी जखमी

क्रेन कोसळून रिक्षाचालक आणि प्रवासी जखमी
क्रेन कोसळून रिक्षाचालक आणि प्रवासी जखमी फोटो: ठाणे वैभव

ठाणे : आनंद नगर ते साकेत या उड्डाणपुलाचे काम सुरु असताना सिद्धेश्वर तलावाजवळील सेवा रस्ता येथे आज दुपारी रिक्षावर क्रेन पडून झालेल्या दुर्घटनेत एक प्रवासी आणि रिक्षाचालक जखमी झाला. 

एमएमआरडीएमार्फत आनंदनगर ते साकेत उड्डाणपुलाचे काम करत असताना विकास कामासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये क्रेन पडली. त्याचवेळी कॅडबरी नाक्याकडे चाललेल्या रिक्षावर ही क्रेन पडून अपघात झाला. या अपघातात अंबरनाथ येथे राहणारे  रिक्षाप्रवासी फारुख शेख (२९)   यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. त्यांना लेकसिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अज्ञात रिक्षाचालकाला देखील किरकोळ दुखापत झाली. त्याच्यावर किरकोळ उपचार करून घरी सोडण्यात आले. 

यावेळी सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. मात्र लवकरच वाहतूक विभागाच्या पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475