जिल्हा

१८ वर्षांच्या 'बिजली'ने घेतला अखेरचा श्वास!

१८ वर्षांच्या 'बिजली'ने घेतला अखेरचा श्वास!
१८ वर्षांच्या 'बिजली'ने घेतला अखेरचा श्वास! फोटो: ठाणे वैभव

लाडक्या वाघिणीने पर्यटकांसह कर्मचाऱ्यांना घातली होती भुरळ 

ठाणे: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात २०१६ पासून वास्तव्यास असलेल्या 'बिजली' (T2) नावाच्या १८ वर्षे चार महिने वयाच्या वाघिणीचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बिजली गेल्या काही दिवसांपासून वयोमानामुळे होणाऱ्या आजारांनी ग्रस्त होती. अखेर बुधवार १६ सप्टेंबरच्या रात्री सुमारे ९:४५ वाजता तिची प्राणज्योत मालवली.

उद्यान प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यापासून बिजलीने अन्न घेणे कमी केले होते. तिची खालावती प्रकृती पाहून डॉक्टरांचे पथक तिच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवून होते. विशेष वैद्यकीय उपचार, देखभाल आणि देखरेखीनंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि बुधवारी रात्री तिचा मृत्यू झाला.

बिजलीला ११ जुलै २०१६ रोजी मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातून बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. गेल्या एका दशकाहून अधिक काळ ती उद्यानाच्या संरक्षणात होती. या काळात ती पर्यटकांच्या तसेच उद्यानातील कर्मचारी आणि डॉक्टरांच्या विशेष पसंतीस उतरली होती.

प्राथमिक माहितीनुसार, वयोमानामुळे उद्भवलेल्या आजारांमुळेच तिचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. असे असले तरी, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट व्हावे यासाठी वैद्यकीय नियमांनुसार तिचे शवविच्छेदन केले जाणार आहे.

बिजलीच्या निधनानंतर उद्यान प्रशासनाने एक भावनिक आवाहन केले आहे. गेल्या काही वर्षांत ज्या पर्यटकांनी किंवा वन्यजीव प्रेमींनी बिजलीला पाहिले असेल किंवा तिचे फोटो काढले असतील, त्यांनी तिच्या आठवणी आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिला श्रद्धांजली वाहावी, असे प्रशासनाने म्हटले आहे. बिजलीच्या जाण्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक महत्त्वाचा अध्याय संपुष्टात आला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475