जिल्हा

सभापतींची शहर अभियंत्याला मारहाण

सभापतींची शहर अभियंत्याला मारहाण
सभापतींची शहर अभियंत्याला मारहाण फोटो: ठाणे वैभव

बदलापूर नगरपालिकेत काम बंद आंदोलन 

बदलापूर : विकास कामाच्या प्रकरणावरून बदलापूर पालिकेचे पाणीपुरवठा समितीचे सभापती शैलेश वडनेरे यांनी शहर अभियंता टेंभेकर यांना दालनात बोलावून शिवीगाळ आणि मारहाण केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.

पाणीपुरवठा सभापती शैलेश वडनेरे यांनी मागील ११ महिन्यांपासून विकासकामांचे प्रस्ताव मंजूर होत नसल्याबाबत जाब विचारण्यासाठी अभियंता संदीप टेंभेकर यांना गुरुवारी दुपारी सहाव्या मजल्यावरील दालनात बोलावले होते. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर वाद वाढला. यावेळी वडनेरे यांनी शिवीगाळ करून आपल्याला मारहाण केल्याची तक्रार टेंभेकर यांनी केली आहे. या घटनेमुळे पालिकेतील वातावरण चांगलेच तापले.

घटनेच्या निषेधार्थ दुपारी पावणे एकच्या सुमारास पालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि अभियंते एकत्र आले. पालिका इमारतीबाहेरील प्रांगणात त्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा देत लोकप्रतिनिधींकडून होणारी दादागिरी सहन केली जाणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला. सरकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा निषेध करत यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नासल्याचं निर्धार केला. आंदोलन तीव्र होत असल्याचे लक्षात आल्यानंतर नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी आंदोलनस्थळी जाऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही, तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती भूमिका घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. 

अभियंता टेंभेकर, नगराध्यक्षा घोरपडे आणि मुख्याधिकारी  गायकवाड यांच्यात नगराध्यक्षांच्या दालनात  चर्चा झाली. विकासकामांसाठी निधी व निविदा प्रक्रियेबाबत निर्णय झाले असून पुढील आठवड्यात निविदा प्रक्रिया होणार होती, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या प्रकरणात समन्वय साधून वाद मिटविण्याचा प्रयत्न करण्याची भूमिका नगराध्यक्षांनी घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन मागे घेतले.

अभियंता संदीप टेंभेकर यांनी केलेला मारहाणीचा आरोप चुकीचा असून कोणत्याही प्रकारची हाणामारी झालेली नाही. शहरातील विकासकामांचे प्रस्ताव मंजूर होत नसल्याने त्याबाबत जाब विचारण्यासाठी त्यांच्याशी चर्चा झाली. यावेळी आमच्यात केवळ शाब्दिक वाद झाला. शहरातील नागरिकांनी  विकासकामांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे नागरिकांची कामे रखडत असतील, तर त्याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारणे गैर नाही, अशी प्रतिक्रिया सभापती शैलेश वडनेरे यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475