जिल्हा

व्यवसाय गोळ्या-बिस्किटांचा अन् विक्री गुटख्याची

व्यवसाय गोळ्या-बिस्किटांचा अन् विक्री गुटख्याची
व्यवसाय गोळ्या-बिस्किटांचा अन् विक्री गुटख्याची फोटो: ठाणे वैभव
ठाणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भिवंडीत मोठी कारवाई केली असून गोळ्या बिस्किट विक्री करणाऱ्या दुकानदाराने प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक केल्याचे आढळून आले. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी शांतीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाला गस्ती घालत असताना प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या पथक आणि शांतीनगर पोलिसांनी भिवंडी येथील पिराणीपाडा परिसरात धाड टाकली. त्यावेळी एका गाळ्यामध्ये प्रतिबंधित गुटख्याचा साठा आढळून आला. पथकाने गाळ्याच्या मालकाबाबत विचारणा केली असता, दुकानामध्ये गोळ्या बिस्किटांची विक्री करणारा एकजण पुढे आला. त्याने त्याचे नाव शाहिद मुस्ताक अहमद अन्सारी असल्याचे सांगितले. या कारवाईत पथकाने एक लाख ५९,३५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475