जिल्हा

दूध भेसळ : ४७० लिटर दूधासह साहित्य जप्त

दूध भेसळ : ४७० लिटर दूधासह साहित्य जप्त
दूध भेसळ : ४७० लिटर दूधासह साहित्य जप्त फोटो: ठाणे वैभव
भाईंदर : दहिसर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईत, अमूल आणि गोकुळ यांसारख्या नामांकित ब्रँडच्या दुधात भेसळ करून ते लोकांना विकल्याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून ४७० लिटर भेसळयुक्त दूध, बनावट पॅकेजिंग साहित्य आणि दुधात भेसळ करण्याची उपकरणे जप्त केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी ब्रँडेड दुधाची पाकिटे उघडून, त्यात दूषित पाणी मिसळत आणि नंतर ती पाकिटे पुन्हा सीलबंद करून बाजारात अस्सल दूध म्हणून विकत असत. या भेसळयुक्त दुधामुळे लहान मुलांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. आरोपी अमूल आणि गोकुळ कंपनीचे दुधाचे पॅकेट ब्लेडने काळजीपूर्वक उघडायचा. तो पाकिटातून थोडे दूध बाहेर काढायचा. त्याऐवजी त्यात घाणेरडे आणि अशुद्ध पाणी मिसळत असे. मग तो गरम चूल आणि मेणबत्तीच्या साहाय्याने ते पाकीट पुन्हा बंद करायचा. यानंतर तोते अस्सल ब्रँडेड दूध असल्याचा दावा करून ग्राहकांना विकायचा. या प्रकारे ग्राहकांची सहज फसवणूक होत होती. कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून अंदाजे २९,७५० रुपये किमतीचे दूध,अमूल आणि गोकुळ ब्रँडची ३२७ रिकामी पाकिटे, दूध भेसळ उपकरणे, एक मोबाईल फोन जप्त केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475