जिल्हा

वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांसह सात जणांना चिरडण्याचा प्रयत्न

वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांसह सात जणांना चिरडण्याचा प्रयत्न
वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांसह सात जणांना चिरडण्याचा प्रयत्न फोटो: ठाणे वैभव
अवजड वाहन चालकाला अटक ठाणे: जड-अवजड वाहन वाहतूकीचा नियम पाळण्याची विनंती करणाऱ्या कोपरी उप वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर दहा चाकी डंपर चढवण्याचा तसेच इतर सात जणांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोपरी पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. ही कोंडी नियंत्रणात ठेवण्याचे काम वाहतूक पोलिसांकडून केले जात आहे. मात्र हे काम करत असताना बेशिस्त वाहन चालकांच्या वाहन चालवण्याचा फटका वाहतूक अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही बसू लागला आहे. ठाण्यातील घोडबंदर मार्गावर चितळसर मानपाडा पोलीस ठाण्याजवळ वाहतूकीचे नियमन करताना उप आयुक्त पंकज शिरसाट यांना एका रिक्षा चालकाने धडक देऊन तेथून पळ काढला होता. त्यात शिरसाट यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती, ही घटना ताजी असतानाच कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (ता.20) सायंकाळी 7:54 वाजता एम.एच. 43 बीपी 4944 क्रमांकाचा डंपर वाहतूक नियंत्रित करण्याच्या कर्तव्यावर असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह पाच पोलिस कर्मचारी आणि दोघा खासगी कामगारांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ठाण्यात सुरु असलेल्या जड अवजड वाहतूकीच्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी हे कर्मचारी आंनद नगर चेक नाका येथे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी तेथून हा डंपर वाहतूकीच्या नियमांचा भंग करून पुढे जात होता. तो अडवल्याने डंपर चालकाने रागाच्या भरात डंपर त्यांच्या सगळ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करून तेथून वेगाने ठाण्याच्या दिशेने निघून गेला. कर्तव्यावर असलेले कोपरी वाहतूक उप विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक डी. एस. राजपूत, पोलीस शिपाई पाटील, चालक महिला पोलीस शिपाई श्वेता काकडे, कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार देवरे, पोलीस शिपाई इंगळे, पोलीस शिपाई बच्छे, जवणे आणि दोन खासगी कामगार यांनी प्रसंगावध साधून बाजूला उड्या घेतल्या. त्यामुळे थोडक्यात बचावल्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी सांगितले. दोन दिवसानंतर कोपरी पोलिसांनी डंपर चालकाला (ता.22) ताब्यात घेतेले. पुढील तपास कोपरी पोलिसांकडून सुरु आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475