जिल्हा

दुचाकीवरील तीन मित्रांचा जागीच मृत्यू; घटनास्थळी जमाव संतप्त

दुचाकीवरील तीन मित्रांचा जागीच मृत्यू; घटनास्थळी जमाव संतप्त
दुचाकीवरील तीन मित्रांचा जागीच मृत्यू; घटनास्थळी जमाव संतप्त फोटो: ठाणे वैभव
मुंब्रा बायपासवर भीषण अपघात ठाणे : मीरा-भाईंदर येथे डंपरखाली येऊन एका डिलिव्हरी बॉयचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली होती. अपघाताची ही घटना ताजी असतानाचा आता मुंब्रा येथील गावदेवी बायपास येथे कंटनेरच्या अपघातात तीन तरुण मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. येथील बायपासवरुन जाणाऱ्या मोठ्या कंटेनरखाली येऊन तीन स्थानिक मुलांचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली होती. तर, पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आपल्या बाईकवरुन ही मुले कामानिमित्त बाहेर चालली होती, त्यावेळेस कंटेनरला धडक दिल्याने हा अपघात घडला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्रवीण पवार यांनी अपघातस्थळी मुंब्रा पोलीस स्टेशन, मुंब्रा फायर ब्रिगेड, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि रुग्णवाहिकेला त्वरीत बोलावून मदतकार्य सुरू केले. अपघातात मृत्यूमुखी पडलेली तीनही मुले 18 ते 23 वयोगटातील असल्याची माहिती मिळते. अफजल मोईनुद्दीन हसन हा दुचाकीस्वार होता. आपल्या ॲक्सिस ऍक्टिवा गाडीने हे तिघे शिळफाटाच्या दिशेने जात होते, तेव्हा अपघाताची भीषण घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475