जिल्हा
गोरखगडावरुन खोल दरीत पडून पर्यटकाचा मृत्यू
गोरखगडावरुन खोल दरीत पडून पर्यटकाचा मृत्यू
फोटो: ठाणे वैभव
मुरबाड: ऐरोली येथील काही पर्यटक मुरबाड तालुक्यातील गोरखगड येथे ट्रेकिंगसाठी आले होते. ते खोपिवलीमार्गे न जाता देहेरी गावाकडून गड चढायला सुरुवात केली. गडाच्या जेमतेम अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहचत असताना ऋषिकेश जाधव (24) हा तरुण पाय घसरून थेट शंभर फुट खोल दरीत कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला.
याबाबतची माहिती भारत जाधव यांनी मुरबाड पोलिसांना दिली. त्यांनतर मुरबाड पोलीस, रेस्क्यु टीम आणि स्थानिक गावकरी यांच्या मदतीने मयत तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. हा तरुण मुळचा सांगोळा जि.सोलापूर येथील रहिवासी असून, तो मित्रांसोबत फिरायला आला होता. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार महादेव खोमणे हे करीत आहेत.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475