देश-विदेश

इराण-इस्त्रायल शस्त्रसंधी होताच सोने-चांदीचे दर घसरले

इराण-इस्त्रायल शस्त्रसंधी होताच सोने-चांदीचे दर घसरले
इराण-इस्त्रायल शस्त्रसंधी होताच सोने-चांदीचे दर घसरले फोटो: ठाणे वैभव
मुंबई: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पाश्वभूमीवर सोने आणि चांदीचे दर वाढले होते. अखेर इस्त्रायल आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. इराण आणि इस्त्रायल संघर्ष थांबल्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर झाला आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 91550 रुपये इतका आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 99870 रुपये इतका आहे. या प्रमाणं चांदीच्या दरात देखील घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. चांदीचे दर घसरुन 100900 रुपयांवर आले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर गोल्ड फ्युचर्सचे दर एक लाख रुपयांवर गेले होते. त्यामध्ये घसरण होऊन ते 98163 रुपयांवर पोहोचले आहेत. एमसीएक्सवर चांदीच्या वायद्यांचे दर 105962 रुपयांवर आहेत. राजधानी नवी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 92,440 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 100830 रुपये इतका आहे. या प्रमाणं अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 91600 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 99920 इतका आहे. पाटणामध्ये अहमदाबादच्या दराप्रमाणेच सोन्याची विक्री होत आहे. हैदराबाद, चेन्नई, बंगळुरु आणि कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 91550 रुपये इतका आहे तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 99970 रुपये इतका आहे. इराण आणि इस्त्रायल यांच्यातील शस्त्रसंधी होताच सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या बाजारासंदर्भातील जाणकारांच्या मते सोन्याच्या दरात येत्या काही दिवसांमध्ये तेजी पाहायला मिळू शकते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475