जिल्हा

रंगायतन पाठोपाठ घाणेकर नाट्यगृह दोन महिने दुरुस्तीला

रंगायतन पाठोपाठ घाणेकर नाट्यगृह दोन महिने दुरुस्तीला
रंगायतन पाठोपाठ घाणेकर नाट्यगृह दोन महिने दुरुस्तीला फोटो: ठाणे वैभव
नाट्यरसिकांचा होणार हिरमोड ठाणे: मागिल अनेक महिने दुरुस्तीच्या नावाखाली राम गणेश गडकरी रंगायतन बंद ठेवण्यात आले आहे. ते पुन्हा कधी सुरु होणार याची तारीख निश्चित झाली नसतानाच काशिनाथ घाणेकर नाट्यगृह दुरुस्तीच्या कामासाठी दोन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नाट्य रसिकांमध्ये नाराजी पसरली आहे. ठाणे शहराचा मानबिंदू म्हणून राम गणेश गडकरी रंगायतनकडे पहिले जात आहे. या नाट्यगृहाचा कायापालट करण्यात येणार आहे. रंगायतनच्या कामासाठी आवश्यक असलेला निधी राज्य शासनाकडून पालिकेला प्राप्त झाल्यानंतर त्याबाबतची निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरुवात करण्यात आली. त्यानंतर १ मे रोजी हे नाट्यगृह रसिक प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. त्यानंतर १५ मे ची मुदत देण्यात आली होती. मात्र, कामास होत असलेल्या विलंबामुळे ३१ मे चा मुहूर्त ठरला होता. तो मुहूर्त देखील हुकाल्यानंतर आता पालिका प्रशासनाकडून गडकरी रंगायतन कधी खुले होणार याबाबत कोणतेही भाष्य करण्यात येत नसून त्यावर बोलणे अधिकारी देखील टाळत आहे. नाट्य आणि संगीत प्रेमी रसिकांना डॉ. काशिनाथ घाणेकर हे नाट्यगृह आधार होते, परंतु डॉ. घाणेकर नाट्यगृहाच्या छतावर सन २००९ १० मध्ये पत्रे बसविण्यात आले होते. हे पत्रे जुने व जीर्ण झाल्यामुळे त्यांना छोटे छोटे छिद्र पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यात पावसाळा देखील सुरु असून त्यातून पाणी झिरपून नाट्यगृहाच्या आतील बाजूस असलेल्या फॉलसिलिंगवर पडून दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून ७ जुलैपासून घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कामासाठी साधारणतः दोन महिन्याचा कालावधी लागणार असून ४० लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. दरम्यान, ठाणे पालिका क्षेत्रातील दोन्ही नाट्यगृहे दुरुस्तीच्या कारणासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने नाट्यरसिकांचा हिरमोड होणार असून त्यांना मुलुंड येथील कालिदास नाट्यगृह गाठावे लागणार असल्याचे दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर गडकरी रंगायतनचा पडदा उघडून नाट्य रसिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475