जिल्हा

पाच वर्षांतील सर्वच कामांची एसआयटीमार्फत चौकशी करावी

पाच वर्षांतील सर्वच कामांची एसआयटीमार्फत चौकशी करावी
पाच वर्षांतील सर्वच कामांची एसआयटीमार्फत चौकशी करावी फोटो: ठाणे वैभव

मनोज प्रधान यांची मागणी

ठाणे : ठाणे महानगरपालिकेत सध्या अधिकारी आणि ठेकेदार यांचे साटेलोटे आहे. विविध रस्त्यांवर खोदण्यात आलेले चर बुजवण्यासाठी सुमारे सात कोटी रूपयांचे टेंडर काढले जात असतील आणि त्याची बिले अदा केली जात असतील तर ठाणेकरांच्या करातून घेतलेल्या पैशांचा हा अपव्यय तर आहेच; शिवाय ठाणेकरांची फसवणूकही आहे. असाच प्रकार 395 कोटींच्या कामाबाबतही झाला आहे. या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचीही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. 

या कामांच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते पाहणी करून पुरावे गोळा करणार आहेत. त्याआधारे आम्ही ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमधील रॅकेट उद्ध्वस्त करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला. 

चर बुजवण्याच्या कामात झालेल्या सात कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप शिवसेना नगरसेवक राजू फाटक यांनी केला आहे. या घोटाळ्याबाबत मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे युवक कार्याध्यक्ष राजेश कदम यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे. या घोटाळ्याची सखोल चौकशी करून हे ठेके रद्द करावेत, अशी मागणी मनोज प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

७ सप्टेंबरला मी 395 कोटींच्या कामांबाबत एक पत्र दिले होते. आजपासून आमचे कार्यकर्ते या ३९५ कोटीची जी कामे जिथे केलेली आहेत, त्या जागेवर जाऊन स्वतः पाहणी करून अधिकारी आणि ठेकेदारांचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत, असा इशारा प्रधान यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475