जिल्हा

सात स्वीकृत नगरसेवकपदांसाठी कोणाची लागणार लॉटरी?

सात स्वीकृत नगरसेवकपदांसाठी कोणाची लागणार लॉटरी?
सात स्वीकृत नगरसेवकपदांसाठी कोणाची लागणार लॉटरी? फोटो: ठाणे वैभव

३५ इच्छुकांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी नोटिसा

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या सात स्वीकृत नगरसेवकपदांची निवड १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महासभेत करण्यात येणार आहे. मात्र, ४२ इच्छुकांनी अर्ज दाखल केल्यानंतर कागदपत्रांच्या छाननी प्रक्रियेत अनेक अर्जांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोणाची निवड होणार आणि कोणाचा अर्ज बाद होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सात स्वीकृत नगरसेवकांची निवड १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सात पदांसाठी तब्बल ४२ इच्छुकांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. महापालिकेने केलेल्या छाननीमध्ये ३५ उमेदवारांच्या अर्जांसोबत आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित उमेदवारांना महापालिकेच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

उमेदवारांची पात्रता, अनुभव, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत संस्थेचा चेंज रिपोर्ट, संबंधित उमेदवार त्या संस्थेत कोणत्या पदावर कार्यरत आहे, तसेच मागील पाच वर्षांचा अहवाल आदी कागदपत्रे महापालिकेने मागवली आहेत. ही कागदपत्रे उपलब्ध नसलेल्या उमेदवारांची निवड अडचणीत येण्याची शक्यता असल्याने इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत.

या ४२ उमेदवारांमध्ये माजी आमदार पप्पू कलानी यांच्या सून पंचम कलानी यांचाही समावेश आहे. त्यांच्या अर्जासोबतच्या कागदपत्रांची छाननी पूर्ण झाल्यानंतरच त्यांच्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या नियुक्तीबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. महापालिकेच्या राजकीय समीकरणानुसार सात स्वीकृत नगरसेवकांपैकी चार पदे भाजपच्या वाट्याला, तर तीन पदे शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांतील इच्छुकांमध्येही निवडीसाठी चुरस निर्माण झाली आहे.

दरम्यान, छाननीदरम्यान कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळलेल्या उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे नव्याने सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. यामध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयातील चेंज रिपोर्ट जोडणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कागदपत्रांची पूर्तता न केल्याचे छाननीत आढळल्यास संबंधित उमेदवारावर नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475