जिल्हा

‘अखंड सावधान… वादळ आपल्या उंबरठ्यावर!'

‘अखंड सावधान… वादळ आपल्या उंबरठ्यावर!'
‘अखंड सावधान… वादळ आपल्या उंबरठ्यावर!' फोटो: ठाणे वैभव
हिंदू जागृती मंडळाचा जनजागृतीपर देखावा

ठाणे: गणेशोत्सवाच्या माध्यमातून गेल्या ३५ वर्षांपासून विविध सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवर जनजागृती करणाऱ्या हिंदू जागृती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने यंदा ‘अखंड सावधान-वादळ आपल्या उंबरठ्यावर’ या संकल्पनेतून नागरिकांना जागरूक राहण्याचा संदेश दिला आहे. बदलत्या काळातील विविध आव्हाने आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम याकडे देखाव्याच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले आहे.

यंदाच्या देखाव्यात लव्ह जिहाद, लँड जिहाद, डिजिटल जिहाद, कॉर्पोरेट जिहाद, शैक्षणिक जिहाद आणि धार्मिक जिहाद यांसारख्या विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया, आधुनिक तंत्रज्ञान, फसवणूक आणि दिशाभूल करणारी माहिती यामुळे समाजावर होणाऱ्या परिणामांचे चित्रण करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रील्स, पोस्ट किंवा संदेशांवर तातडीने विश्वास न ठेवता त्यामागील सत्यता तपासावी, स्वतंत्रपणे विचार करावा आणि भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी जबाबदारीने वागावे, असा संदेश मंडळाने तरुणांना दिला आहे. सोशल मीडिया हे माहितीचे प्रभावी माध्यम असले तरी त्याचा वापर विवेकाने करण्याची गरज असल्याचेही अधोरेखित करण्यात आले आहे.

‘अभ्यास, आचरण, संघटन आणि ठोस कृती’ या चतु:सूत्रीच्या माध्यमातून जागरूक नागरिकत्व, सामाजिक एकता तसेच संस्कृती आणि परंपरांचे जतन यांचे महत्त्व सांगण्यात आले आहे. समाजातील घडामोडी समजून घेताना प्रत्येकाने जागरूक आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘वादळ आपल्या उंबरठ्यावर आहे; त्यामुळे डोळे उघडे ठेवून जागृत राहा’, हा यंदाच्या देखाव्याचा मुख्य संदेश आहे. मंडळाचे कार्यवाह केदार सुनील आपटे यांनी याबाबत माहिती दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475