ठाणे: ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सहाव्या दिवशी नागरिकांनी भक्तिमय वातावरणात गणपती व गौरींच्या मूर्तींचे विसर्जन केले. महापालिकेने विविध विसर्जन घाटांवर केलेल्या नियोजनानुसार एकूण १६,०५३ गणपती मूर्तींचे तसेच १०३९ गौरी मूर्तींचे विसर्जन झाले. गणपती व गौरींच्या एकूण १७,०९२ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
उथळसर येथे ६१२, नौपाडा-कौपरी येथे २८०९, कळवा येथे २४९१, दिवा येथे ८२९, मुंब्रा येथे ३४८, माजिवडा-मानपाडा येथे ३७५८, लोकमान्य-सावरकर येथे २३०, वागळे येथे २७४९ आणि वर्तकनगर येथे २२२७ गणपती मूर्तींचे विसर्जन झाले. सर्व प्रभाग समिती मिळून १०३९ गौरींचे विसर्जन करण्यात आले.
गणपती विसर्जनासाठी टँक विसर्जन व्यवस्था, मूर्ती स्वीकृती व्यवस्था, कृत्रिम तलाव, खाडी घाट तसेच फिरती विसर्जन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. या विविध व्यवस्थांच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ व सुरक्षित विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
गणपती विसर्जनाच्या एकूण १६,०५३ मूर्तींपैकी ३७२६ मूर्तींचे टँक विसर्जन व्यवस्थेद्वारे, १५८ मूर्तींचे मूर्ती स्वीकृती व्यवस्थेद्वारे, १०,२०७ मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये, १९३८ मूर्तींचे खाडी घाटावर, तर २४ मूर्तींचे फिरती विसर्जन व्यवस्थेद्वारे विसर्जन करण्यात आले.